मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात. यावर्षीच्या महापरिनिर्वाणदिनीही लाखो लोकांनी चैत्यभूमीवर उपस्थिती दर्शवली. वास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला वाचा, शिका आणि संघटित व्हा असा दीर्घकालीन संदेश दिला होता.
काही वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा अधिकृत पणे उपलब्ध झाली तेव्हा तिथे उंच पुतळा करूया, बागा बांधूया अशा कल्पना राजकीय नेते मांडत होते. त्याचवेळी २०१३ साली इंदू मिलच्या ठिकाणी बाबासाहेबांच स्मारक म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्यदिव्य वाचनालय उभं करावं हा प्रस्ताव सर्वप्रथम राज ठाकरेंनी मांडला होता. २०१४ साली जेव्हा महाराष्ट्राच्या विकास आराखडा अर्थात ब्लू-प्रिंट सादर केली गेली तेव्हा सुद्धा या आंतरराष्ट्रीय आंबेडकर स्मारकाचा उल्लेख आवर्जून करण्यात आला होता. त्यामागील मुख्य कारण होतं ते डॉ. बाबासाहेबांनी जगाला दिलेला कानमंत्र म्हणजे वाचा, शिका आणि संघर्ष करा…आणि त्याच विचाराला साजेसं स्मारक असलं पाहिजे असा विचार त्यांनी २०१४ मध्ये मांडला होता.
काय आहे तो नेमका व्हिडिओ;
