मुंबई : भारतीय जनता पक्षाला मनसे अध्यक्षांनी व्यंगचित्रांची मालिका प्रसिद्ध करून हैराण करून सोडले आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा चार साडेचार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ‘फेकलेले’ हजारो, लाखो कोटींचे आकडे आकडे पाहून लक्ष्मी सुद्धा थक्क झाल्याचे व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केले आहे.
सामान्य जनतेला देण्यात येणाऱ्या मोठमोठ्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी व्यंगचित्र प्रसिद्ध करून नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. दरम्यान, या प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे साक्षात लक्ष्मी देवता त्यांच्या फोटोंसमोर उभी आहे. आणि या तिघांच्या फोटोंकडे पाहून लक्ष्मी देवी म्हणतेय की,”बाबांनो गेल्या साडेचार वर्षात जनतेसमोर फेकलेले हजारो, लाखो कोटींचे आकडे ऐकून मीसुद्धा थक्क झाले आहे’. अशा पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या तिघांवर बोचरी टीका केली आहे.
काय आहे ते नेमकं प्रसिद्ध करण्यात आलेलं व्यंगचित्र?
