मुंबई : तब्बल २ वर्षानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत पुन्हा धडाकेबाज प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला विधानसभेत पुन्हा बळ मिळणार आहे. छगन भुजबळांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात सहभाग नोंदविला आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सहभागी झाले. त्यांचे आज विधानभवन परिसरात आगमन होताच भुजबळांच्या स्वागतासाठी स्वतः अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट आणि राष्ट्रवादीचे अनेक जेष्ठ नेते व आमदारांची विशेष उपस्थिती होती.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘कौन आया कौन आया, राष्ट्रवादीका शेर आया’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. तत्पूर्वी छगन भुजबळांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती तसेच मी सामान्य जनतेच्या विषयांवर विधानसभेत तर बोलणारच आहे परंतु जनतेमध्ये जाऊन सुद्धा या सरकारला जाब विचारणार असल्याचे ठणकावून सांगितले होते.

NCP leader and former deputy cm of maharashtra chagan bhujabal arrived in vidhan sabha after two years