नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदार विद्या चव्हाण यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांच्या फेसबुकवर माहिती देणारी एक पोस्ट टाकली आहे.
त्यानुसार नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात इथे उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा अत्यंत अश्लाघ्य प्रकारे विनयभंग केला असे म्हटले आहे. तसेच त्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर प्रचंड दबाव टाकला जात असून तिला तोंड न उघडण्याची धमकी देण्यात येत आहे असं म्हटलं आहे.
दरम्यान हे संपूर्ण प्रकरण खूप गंभीर असल्याने राष्ट्रवादीने या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देईल आहेत.
व्हिडिओ : नेमकं काय म्हटलं आहे विद्या चव्हाण यांनी?
