1 May 2025 4:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

तर ती प्रकाश आंबेडकर यांची पहिली व शेवटची राजकीय चूक ठरेल? सविस्तर

Prakash Ambedkar

मुंबई : महाराष्ट्रासारख्या राज्यात भीमा-कोरेगाव सारखी दुर्दैवी घटना घडणे ही खरंच लाजिरवाणी गोष्ट होती. दोन समाज आणि त्यांची मन त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीने दुभंगली होती. त्यात समाज माध्यमांवरील अफवा आणि विकृत प्रचाराने सीमा ओलांडल्याने परिस्थिती अनेक महिने नाजूक होती. त्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भाजप आणि शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांबद्दल वंचित बहुजन समाजात मोठी चीड निर्माण झाली. परंतु, या संपूर्ण घडामोडीत काही ठराविक भागा पुरतं मर्यादित असलेलं प्रकाश आंबेडकर यांचं नैतृत्व राज्यपातळीवर पोहोचलं.

व्यवसायाने वकील असलेले आणि मुख्य म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असल्याने बहुजन समाज, भीमा-कोरेगाव घटनेनंतर प्रकाश आंबेडकरांच्या समाजाप्रतीच्या ताटर भूमिकेमुळे त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणावर आकर्षित झाला. त्याचा मोठा राजकीय फटका स्वतः रामदास आठवलेंना देखील बसल्याचे पाहायला मिळते आहे. आजच्या घडीला रामदास आठवलेंना ना भाजप विचारत, ना काँग्रेस-राष्ट्रवादी अशी अवस्था झाली आहे.

एकूणच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रामदास आठवले यांचं राजकीय महत्व जवळपास संपुष्टात आलं असताना, दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर यांचं राजकीय महत्व १०० पट वाढलेलं आहे. परंतु एकंदर राजकारणाचा विचार करता, प्रकाश आंबेडकर यांना परिस्थितीने दिलेली राजकीय संधी शून्यात रूपांतर होण्याच्या दिशेने जाताना दिसते आहे. कारण, एका बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने कमीत कमी २-३ लोकसभेच्या जागा पक्षाच्या हाती लागण्याची संधी असताना प्रकाश आंबेडकर एमआयएम’सोबत युती करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेताना दिसत आहेत. कारण, ज्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला ते विरोध करत आहेत, त्याच्याच भीतीने मुस्लिम समाज मागच्या वेळी एमआयएम’ला जशी मतं देऊन बसला, ती चूक ते यंदा करणार नाहीत आणि एकगठ्ठा काँग्रेसकडे जातील यात शंका नाही. कारण एमआयएम’च २०१४ पासूनच राजकारण भाजपाला पोषक असल्याची विचारसरानी मुस्लिम समाजाच्या मनात निर्माण झाली आहे.

तसाच प्रकार मोठ्या प्रमाणावर बहुजन समाजाच्या मनात देखील हळूहळू घर करताना दिसत आहे. कारण प्रकाश आंबेडकरांनी एमआयएम’ला सोबत घेऊन एकाला चलो रे अशी भूमिका घेतली आणि राज्यातील सर्व जागा जरी लढवल्या तरी त्यांची लोकसभेची एकही जागा निवडणूक येणार नाही हे वास्तव आहे. कारण प्रकाश आंबेडकर यांची मागील काही महिन्यापासूनची व्यूहरचना पाहिल्यास ते केवळ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा पाडण्यासाठी आणि भाजपाला पोषक राजकारण करत आहेत अशी दबक्या आवाजात चर्चा बहुजन समाजातच रंगलेली दिसते आहे. तसेच ते भाजपच्या फायद्यासाठीच ही खेळी करत असल्याची चर्चा समाज माध्यमांवर खुलेआम होताना दिसते आहे. त्यासाठी भाजपचं आर्थिक रसद पुरवत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांनी याआधी
देखील म्हटलं आहे. त्यामुळे बहुजन समाजात देखील नकारात्मक विचार घर करू लागला आहे.

परंतु राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी संधी आज कोणाकडे चालून आली असेल तर ती प्रकाश आंबेडकर यांच्याकडे अशीच सध्याची परिस्थिती सांगते. परंतु, प्रकाश आंबेडकरांचे त्या संधीचंसोनं करण्यात अपयशी ठरले तर ती त्यांची पहिली आणि शेवटची राजकीय चूक ठरेल आणि त्याचा मोठा फटका त्यांना विधानसभेत देखील बसल्याच पाहायला मिळेल. परंतु आज जर ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत थोडं नमतं घेत गेल्यास, त्यांच्या लोकसभाच्या हमखास २-३ जागा निवडून येतील आणि परिणामी विधानसभेत मोठी मजल मारता येईल. त्यामुळे आलेल्या संधीच प्रकाश आंबेडकर कसं सोनं करतात ते पाहावं लागणार आहे. कारण एमआयएम’सोबत जाऊन त्यांचा फायदा होईल हा त्यांचा राजकीय अंदाज चुकीचा ठरण्याची शक्यता अधिक आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या