2 May 2025 3:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

पाकिस्तानी शरीफ माणसांच्या भेटी, गुजरातमधील झोकाळे आणि फसलेली परराष्ट्रनीती?

Narendra Modi

नवी दिल्ली : युनो’मध्ये घडलेल्या घडामोडीने आज नरेंद्र मोदींची परराष्ट्रनीती किती फसवी होती याचा प्रत्यय करून दिला आहे. २०१४ नंतर राष्ट्रीय प्रतिमा तयार होण्याआधीच स्वतःला आंतराष्ट्रीय स्तरावर मोठं करण्यासाठी परदेशात देखील अनेक इव्हेंट शिस्तबद्ध आयोजित करण्यात आले आले. त्यात अनेक निर्णय आकस्मितपणे घेतले गेले आणि त्यात प्रमुख म्हणजे पाकिस्तानमधील नवाज शरीफ यांची आकस्मित भेट. कारण २०१४ पासून ‘मोदींचा मास्टरस्ट्रोक’ नावाच्या ठळक हेडलाईन म्हणजे सध्याच्या पेड प्रसार माध्यमांना जडलेला आजारंच म्हणावा लागेल.

कारण, नरेंद्र मोदी म्हणतील आणि सांगतील ती पूर्वदिशा असे समीकरण माध्यमांनी करून घेतले आहेत. मग त्यात चीन आणि पाकिस्तानच्या बाबतीत घेतलेले कोणतेही निर्णय असोत, त्याचे योग्य विश्लेषण झालेच नाही. कारण, परराष्ट्र नीती पेक्षा जागतिक नेते म्हणवून घेण्याची अधिक घाई त्यांच्या अशा इव्हेंटमधून वारंवार निदर्शनास आली आहे. पुलवामामधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकनंतर आंतरराष्ट्रीय दबावाखाली पाकिस्तान झुकला खरा, परंतु त्याला मोदींची कूटनीती आणि डोवल यांची जेम्स बॉण्ड गिरी अशा बातम्या झळकल्या. वास्तविक कारण हेच होतं की, अमेरिका, फ्रांस, इंग्लंड आणि रशिया या युनोमधील स्थायी सदस्य देशांचे भारतासोबत असलेले आर्थिक हितसंबंध आणि देशांतर्गत गुंतवणूक हेच मूळ कारण आहे.

परंतु, त्याउलट चीन आणि पाकिस्तान यांचे आपसातील आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील हितसंबंध देखील आजच्या युनोतील चीनच्या भूमिकेशी संबंधित आहेत. उलटपक्षी भारतात आजहि अगदी लहान मुलांच्या खेळण्यांपासून ते मोठं मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील संबंधित विषयांवरून चीनवरच अवलंबून आहे. कारण मोदी सरकाने ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’ नावाची झडप भारतीयांच्या डोलावर लावून सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा ते मोठं मोठी अवजार देखील भारत सरकार चीनमधूनच आयात करत आहे याची भारतीयांना जाणंच नाही. त्यामुळे भारताचं आपल्यावर किती अवलंबून आहे याची चीनला पूर्ण कल्पना आहे. आणि चीनच्या आयात केलेल्या वस्तू गुजराती व्यापाऱ्यांना मोठ्या मार्जिन देत असल्याने, ढोकलाम मुद्दा पेटल्यावर ‘बॅन चायना’ हा दिखाव्याचा उपक्रम सत्ताधाऱ्यांच्या सर्मथकांनी राबवला होता.

त्यामुळे मोदींनी पाकिस्तानात जाऊन शरीफ माणसासोबत खाल्लेला केक असेल किंवा अहमदाबादच्या झोकाळ्यावर बसून चीनच्या पंतप्रधानांसोबत केलेलं फोटोसेशन असेल, ते सर्व केवळ स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावण्यासाठी केलेला खटाटोप आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेला एक स्टंट होता असंच सिद्ध झालं आहे. कारण, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीननं पुन्हा एकदा सुरुंग लावला आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता. परंतु चीननं नकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरवण्याची चीनची ही चौथी वेळ आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या