23 November 2019 8:06 AM
अँप डाउनलोड

मोदींना नेहरुंच्या जॅकेटवर गुलाब दिसला, पण आपल्या जॅकेटवरील नेहमीचं कमळ विसरले?

राजस्थान : सध्या राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील प्रचारात आज काँग्रेसच्या टीकेला उत्तर दिलं. याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींनी हिंदुत्त्वाबद्दल काय माहित आहे असा प्रश्न उपस्थित केला होता. त्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील कृषी क्षेत्राची बिकट अवस्था असण्याला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु जबाबदार असल्याची बोचरी टीका केली.

जवाहरलाल नेहरु यांचं थेट नाव न घेता मोदींनी टीका केली की, ‘एक नेता नेहमी गुलाब वापरायचा आणि त्यांना बागकामाची चांगली माहिती होती, पण शेतीतलं काहीच माहिती नव्हतं. देशातील शेतकऱ्यांना आज ज्या कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे, त्यासाठी केवळ तीच गोष्ट जबाबदार आहे. “ते नेहमी (नेहरु) गुलाब वापरायचे आणि बागकामाची माहिती होती”. पण शेतकरी किंवी कृषी क्षेत्राबद्दल काहीच काळात नव्हतं. हेच कारण आहे की त्यामुळे शेतकऱ्यांची आज कठीण परिस्थिती आहे.

यावेळी उपस्थितांसमोर भाषणादरम्यान नरेंद्र मोदींनी थेट दावा केला की, माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद सोमनाथ मंदिरासाठी अभिषेक करण्यासाठी येत असता नेहरुंनी त्यांना तीव्र विरोध केला होता. त्याच मंदिराचं परदेशी आक्रमणकर्त्यांनी प्रचंड नुकसान केलं होतं, आणि नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्याची दुरुस्ती करत ते मंदीर नव्याने उभं केलं होतं.

दरम्यान, पंडित नेहरू त्यांच्या जॅकेटला नेहमी गुलाब लावायचे म्हणून त्याचा थेट संबंध नेहरूंच्या शेतीच्या ज्ञानाशी जोडण्याचा अजब प्रताप पंतप्रधानांनी यावेळी केला. मग मोदी जर नेहमी त्यांच्या जॅकेटला कमळ लावून फिरतात आणि लक्ष्मी नेहमी कमळात विराजमान असते, म्हणून भाजपाकडे एवढा पैसा आहे, असा तर्क सामान्यांनी काढावा का? अशी कुजबुज स्थानिक विरोधकांमध्ये रंगली होती.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1049)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या