मुंबई : सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेले नागराज मंजुळे, आर्ची आणि परशा’ने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेत प्रवेश केला असून, त्यांनी रीतसर प्राथमिक सदस्यत्व सुद्धा स्वीकारलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या ‘सैराट’ टीमचा ग्रामीण भागात प्रोमोशनसाठी उपयोग होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आर्ची आणि परशा’चा ग्रामीण महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग असल्याने त्याचा फायदा पक्षाला आणि मनसेच्या चित्रपट श्रुष्टीतील दबदब्याचा फायदा या तिघांना सुद्धा भविष्यात होऊ शकतो अशी चर्चा आहे.
वास्तविक नागराज मंजुळे यांनी काही कार्यक्रमात मी जुना शिवसैनिक असल्याचं बोलून दाखवलं होत. परंतु त्यांनी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नैतृत्वावर अधिक विश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे आज नागराज मंजुळे, आर्ची आणि परशा’ने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं आहे.
या सैराट टीमची मनसे इंट्री सध्या चित्रपट श्रुष्टीत चर्चेचा विषय बनला आहे. सध्या मनसे फॉर्मात असून या सैराट प्रवेशाने मनसेत अजून अनेक राजकीय प्रवेश होण्याची शक्यता आहे.
