सोलापूर : गुंतवणुकदारांचे तब्बल ७४ कोटी रुपये परत करण्याचे सेबीचे आदेश धुडकावल्याने राज्याचे सहकारमंत्री सुभास देशमुख यांना ‘सेबी’ अर्थात सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने जोरदार दणका दिला आहे. मंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’चे म्युच्युअल फंड आणि डी-मॅट खात्यांना सेबीकडून सील ठोकण्यात आले आहे. तसंच ७४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मंत्री सुभाष देशमुख यांना नोटीस सुद्धा धाडण्यात आली आहे.
लोकमंगल’मधील गुंतवणुकदारांचे ७४ कोटी रुपये तीन महिन्यात परत करण्याचे आदेश सेबीने १६ मे २०१८ रोजी दिले होते. परंतु, मागील ६ महिन्यांपासून लोकमंगलने सेबीच्या आदेशाला कोणतेही अधिकृत आणि कायदेशीर उत्तरच दिले नाही. त्यामुळे सेबीकडून ही नियमाअंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.
नक्की काय कारवाई केली?
- सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगलची खाती गोठवण्याचा सेबीची नोटीस
- लोकमंगलचे डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडाची खाती गोठवण्याचे सेबीची नोटीस
- लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबरोबरच, नोटीसमध्ये देशमुख यांच्या पत्नी स्मिता देशमुख, वैजनाथ लातूरे, औदुंबर देशमुख, शहाजी पवार, गुर्राना तेली, महेश देशमुख, पराग पाटील यांनाही नोटीस
