3 May 2025 1:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

पहिल्यांदा संतप्त वातावरणात वाटण्या आटपून घेतल्या? आता पाकिस्तानवर हल्ल्याची मागणी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती होण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर तोडगा निघाल्याचे प्रसार माध्यमांकडे वृत्त आहे. पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांच्या बटालियनवर झालेल्या भ्याड हल्लात ४० हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर देशभर संतप्त वातावरण असताना भाजप आणि शिवसेनेदरम्यान मातोश्रीवर जोरदार चर्चा सुरु होती. त्यावेळी तापलेल्या वातावरण शिवसेना आणि भाजपने जागावाटपाचा कार्यक्रम आटपून घेतला असल्याचे वृत्त आहे.

त्यानुसार लोकसभेला शिवसेना २३ तर भाजपा २५ जागांवर लढण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी १४४ जागा लढण्याचा फॉर्म्युला ठरल्याचे वृत्त आहे. दरम्यान, येत्या २-३ दिवसांत भाजपाध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर येऊन बोलणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर जाऊन लोकसभा निवडणुकीतील भाजपा-शिवसेना युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. तसेच पालघरची जागा आपल्याला देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला भारतीय जनता पक्षाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ही जागा शिवसेनेला सोडल्याचे वृत्त आहे.

२०१४ साली केंद्रात एकहाती सत्ता आल्यानंतर भाजपाने दिलेली दुय्यम वागणूक आणि राज्यात सातत्याने शिवसेनेचे खच्चीकरण करण्याची घेतलेली भूमिका यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर भाजपाने शिवसेनेविरोधात आग्रमक धोरण स्वीकारले होते. मात्र राष्ट्रीय पातळीवर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपाला दोन पावले मागे घेत शिवसेनेशी युतीसाठी बोलणी करावी लागली होती.

दरम्यान, सदर विषयाला अनुसरून मातोश्रीवर जागावाटप सुरु असताना समाज माध्यमांवर सडकून टीका करण्यात आली. देशभर वातावरण तापलेले असताना सत्ताधारी भाजप-शिवसेना जागावाटपात मग्न होते. इतकंच नाही तर प्रकृती ठीक नसल्याचे सांगणारे फडणवीस सर्वकाही विसरून मातोश्रीवर रात्री हजर झाले. त्यामुळे सर्वकाही आधी आटपून घेतलं आणि बाहेर टीका सुरु झाल्याचे दिसताच, पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या मागण्या जोर धरू लागल्या आहेत. याआधी देखील पुलवामा येथे लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ला झाला होता आणि त्यावेळी देखील सत्ताधारी सुस्तच होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या