नाशिक : प्रसार माध्यमांनी लवकरच होऊ घातलेल्या राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाविषयी सहज प्रश्न विचारला असता त्यांनी असं उत्तर दिल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवताना आमदार गुलाबराव पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
शिवसेना आमदार गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत पंचांग पाहून मंत्रिमंडळाचा विस्तार करतील असे खोचक उत्तर त्यांनी दिले. त्यांना लक्षात येईल राहू कोण, केतू कोण? असा सूचक इशारा सुद्धा केला. दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले की, आमचं श्रद्धास्थान मातोश्री आहे. तिथून जो आदेश येतो तो आम्हाला मान्य असतो मंत्रिमंडळात काय मिळणार हे माहित नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
व्हिडिओ : काय म्हणाले नेमकी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील?
