19 January 2022 1:53 AM
अँप डाउनलोड

मोदी सरकारविरोधात सोनिया गांधींची डिनर डिप्लोमसी

नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींच्या ‘डिनर डिप्लोमसीत’ एकूण १७ पक्ष सहभागी होणार असल्याचे समोर येत आहे. परंतु त्यात राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार, सपाचे नेते अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त आहे.

त्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीं यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिलं आहे. त्यात देशभरातील एकूण १७ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

या स्नेह भोजनाला राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार, सपाचे नेते अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक आणि अनेक अनेक पक्षांना निमंत्रण धाडण्यात आले असले तरी तेलगू देसम आणि बसपाला मात्र बोलाविण्यात आले नसल्याचे कळविण्यात आले आहे.

परंतु अशी ही माहिती काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून मिळत आहे की, शरद पवार, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे.

लवकरच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारविरोधात सोनिया गांधींची ही ‘डिनर डिप्लोमसी’ असल्याचे म्हटले जात आहे. परंतु त्याला किती यश येईल हे येणारा काळच ठरवेल.

हॅशटॅग्स

#Congress(526)#Soniya Gandhi(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x