11 July 2020 12:52 PM
अँप डाउनलोड

पवारांच्या गाडीच्या मागे धावणारे आज पवारांच्या ताफ्यात सामील, शिवबंधन तोडले

National congress party, ajit pawar, dhananjay munde, chhagan bhujbal, amol kolhe

“स्वराज्य रक्षक संभाजी महाराज” फेम आणि जुने “छत्रपती शिवाजी महाराज” म्हणून माहित असलेले अमोल कोल्हे राष्ट्रवादीत दाखल. आज त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते, आणि आता शिवसेनेच्या दुटप्पी धोरणांना कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जाहीर प्रवेशाच्यावेळी सभेला संभोदित करताना ते म्हणाले एकेकाळी आम्ही शरद पवारांच्या गाडीच्या मागे पळायचो ते फक्त त्यांची १ झलक पाहण्यासाठी पण आज मला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळत आहे याचा मला वेगळाच आनंद आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या वेळी उपस्थित होते.

शिवसेना पक्षाला सोडून येताना फार अवघड असते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करताना वेगळा आनंद मिळाला. माझा आणि अजित पवार यांचा राजकिय संवाद नव्हता. मात्र त्यांचा आणि माझा कौटुंबिक संवाद होता, असे कोल्हे यांनी सांगितले. अमोल कोल्हे ज्या शिवसेना पक्षातून सोडून राष्ट्रवादीत आले तो पक्ष सोडून या मध्ये येताना काय वाटतं हे माझ्यापेक्षा जास्त कोणीचं सांगू शकतं नाही, अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून कोल्हे यांची चर्चा आहे. याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन अशी प्रतिक्रिया दिली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#AmolKolhe(10)#NCP(296)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x