नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि टीडीपी’ने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला आले असता दोन्ही नेत्यांनी चर्चेअंती हा निर्णय प्रसार माध्यमांसमोर घोषित केला. त्यामुळे आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची लढाई भाजपासाठी अधिकच कठीण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना चंद्राबाबू नायडू म्हणाले की, आम्ही देश वाचवण्यासाठी एकत्र येत आहोत. तसेच आम्हाला भूतकाळ विसरावा लागेल आणि आता एकत्र येऊन काम करण ही काळाजी गरज आहे. तसेच सर्व विरोधी पक्ष एकत्र झाला पाहिजे असे आवाहन सुद्धा चंद्रबाबू नायडू याप्रसंगी केलं.

TDP and congress has decided to make alliance for 2019 lok sabha election