गुवाहाटी : देशातील महाभारत कालीन इंटरनेटच अस्तित्व, तरुणांना पानांच्या टपऱ्यांचे सल्ले अशी एक ना अनेक बेताल वक्तव्य करून भाजपला तोंडघशी पडणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांना दिल्लीतून समाज देण्यासाठी बोलावणं. त्यांना २ मे रोजी दिल्लीला येण्याचा निरोप धाडण्यात आला आहे.
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यावर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की,’त्रिपुराला माणिक नव्हे, तर हिऱ्याची गरज आहे’. त्रिपुराच्या जनतेने ‘माणिक’ सरकारला घरी बसून भाजपला सत्ता दिली आणि मोदींनी बिप्लब देब नावाच्या ‘हिऱ्या’च्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली. अखेर काही दिवसातच मोदींना ‘माणिक’ आणि ‘हिऱ्यातला’ फरक समजला आहे.
मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यापासून बिप्लब देब हे वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यामुळेच पंतप्रधानांनी बिप्लब देब यांना समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुख्यमंत्री बिप्लब देब यांना २ मे रोजी दिल्लीत बोलाविण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्री बिप्लब देब हे तोंडाला येईल ते बोलत सुटले आहेत.
‘महाभारत काळात इंटरनेट आणि सॅटेलाईट होतं,’ असं वादग्रस्त विधान केल्यानं देब यांच्यावर चौफेर टीका झाली होती. हा वाद संपायच्या आधीच देब यांनी मिस वर्ल्ड डायना हेडनबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. हा वाद संपायच्या आधीच देब यांनी मिस वर्ल्ड डायना हेडनबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर देब यांनी तरुणांनी पान टपरी करण्याचा सल्ला देऊन नवा वाद ओढवून घेतला. एकूणच भाजपच्या हिऱ्याला समज देण्याची वेळ दिल्लीतील भाजप नेत्यांवर आलेली आहे हे नक्की, ज्यामुळे पक्षाला रोज टीकेचा सामना करावा लागत आहे.
