1 May 2025 6:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA
x

आगामी निवडणूक, पश्चिम विदर्भातील वणी आणि हिंगणघाट मनसे जिंकण्याची शक्यता: सविस्तर

अमरावती : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यावर आहेत. राज ठाकरे यांनी शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते. शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे यांनी जोरदार धक्का दिला घेऊन स्थानिक कार्यकारिणी बरखास्त केली. याचवेळी शहर अध्यक्ष म्हणून पप्पू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शहर कार्यकारिणी येत्या काही दिवसांनी घोषित करण्यात येईल असं वृत्त आहे.

परंतु सामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून राज ठाकरे यांनी तात्काळ निर्णय घेतल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अमरावती येथे आयोजित अंबा महोत्सवाला ते हजेरी लावून तेथे त्यांची प्रकट मुलाखत सुद्धा काल पडली. दरम्यान मनसे अध्यक्ष यावेळी पूर्व आणि पश्चिम विदर्भात मनसेचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी मनसेतर्फे काही मतदारसंघांवरच विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या २ विधानसभा मतदारसंघात मनसे मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे. मनसे अध्यक्षांच्या या दौऱ्यात ते वणीला सुद्धा भेट देणार आहेत.

विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत देशभरात मोदी लाट असताना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारखे पक्ष समोर असताना सुद्धा वणी व हिंगणघाट या दोन मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे विदर्भातील काही निवडक मतदारसंघावर राज ठाकरे विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पूर्व आणि पश्चिम विदर्भात अनेक मतदारसंघात टक्कर देऊ शकतील अशा संभाव्य उमेदवारांना भेटण्यासाठी हा दौरा असल्याचे समजते.

दरम्यान, पश्चिम विदर्भाचा दौऱ्यानंतर राज ठाकरे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पूर्व विदर्भातील अनेक शिवसैनिक व इतर मोठ्या पक्षातील नाराज नेते आणि पदाधिकारी मनसेमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे समजते. दरम्यान, भाजप आणि शिवसेनेबद्दल सत्ताकाळाच्या अनुभवावरून एक रोष पाहायला मिळत आहे आणि काँग्रेस – राष्ट्रवादी सुद्धा काही विशेष सुस्थितीत आहेत असं नाही आणि त्याचा थेट फायदा मनसेला होऊ शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे मनसे ज्या अर्थी विदर्भावर सुद्धा मोठ्या आशेने लक्ष केंद्रित करत आहे, त्यावरून ते शहरी भागात आगामी निवडणुकीत काय राजकीय धिंगाणा घालणार याचा अंदाज येतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या