
Post Office FD Scheme | पोस्ट ऑफिस अंतर्गत विविध योजना राबवल्या जात आहेत. यामधील टाईम डिपॉझिट ही योजना गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरली आहे. ही लोकप्रिय योजना बँकेच्या एफडीप्रमाणे काम करते. त्यामुळे पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेला पोस्ट ऑफिस टीडीऐवजी एफडी योजना म्हणून देखील ओळखले जाते. पोस्ट ऑफिसची एफडी आपल्या गुंतवणूकदारा 1 ते 5 वर्षांसाठी गुंतवणुकीचा कालावधी उपलब्ध करून देते.
गुंतवणुकीचे व्याजदर :
समजा तुम्ही पोस्टाच्या एफडीमध्ये एका वर्षासाठी गुंतवणूक करत असाल तर, तुम्हाला 6.9% दराने व्याज मिळेल. 2 वर्षासाठी गुंतवणूक केल्या 7% व्याज मिळेल, 3 वर्षांमध्ये 7.10% व्याजदर मिळते तर 5 वर्षांसाठी 7.50% व्याजदर मिळते. आज या बातमीतून आपण पोस्टाची 3 वर्षांची योजना किती परतावा देते याविषयीची माहिती पाहणार आहोत. पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 3 वर्षांसाठी 2,4 आणि 10 लाख रुपये गुंतवले असता मिळणारा परतावा किती असेल. याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
2 लाखांची रक्कम गुंतवल्यास किती परतावा मिळणार :
1. 3 वर्षांसाठी गुंतवली जाणारी रक्कम : 2,00,000
2. वार्षिक व्याजदर : 7.1%
3. गुंतवणुकीचा कालावधी : 3 वर्षे
4. मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम : 2,47,230
5. केवळ व्याजदराने कमावलेली रक्कम : 47,230
4 लाखाची रक्कम गुंतवल्यावर मिळणारा परतावा किती :
1. गुंतवणुकीचा कालावधी : 3 वर्षे
2. वार्षिक व्याजदर : 7.1%
3. गुंतवलेली रक्कम : 4 लाख
4. मॅच्युरिटीवर मिळणारा परतावा : 4 लाख 94 हजार 30 रुपये.
5. केवळ व्याजदर आणि कमावलेली रक्कम : 94 हजार 30 रुपये.
10 लाखांची रक्कम गुंतवल्यानंतर मिळणारा परतावा :
1. गुंतवणुकीचे वर्षे : 3
2. 3 वर्षांत गुंतवलेली रक्कम : 10 लाख
3. वार्षिक व्याजदर : 7.1%
4. मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम : 12 लाख 35 हजार 75 रुपये.
5. केवळ व्याजाने मिळवलेली रक्कम : 2 लाख 35 हजार 75 रुपये.