
Post Office Scheme | पोस्टाने आत्तापर्यंत मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी विविध योजना आणल्या आहेत. पोस्टाच्या प्रत्येक योजनेमध्ये मध्यमवर्गीय व्यक्ती पैसे गुंतवण्याचा विचार नक्कीच करू शकतो. कारण की, पोस्ट ऑफिसमधून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये योग्य व्याजदरासह चांगला परतावा मिळवून देण्याची सुरक्षा आणि हमी पोस्टाकडून दिली जाते.
सध्याच्या घडीला पोस्टाच्या एका सीक्रेट योजनेची चर्चा होताना दिसत आहे. ही योजना खासकरून रिटायरमेंटनंतर स्वतःचं आयुष्य आणि आरामात जावं असं वाटणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. या योजनेचे नाव ‘पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना’ असं असून, अनेक ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ घेत आहेत. केवळ जेष्ठ नागरिकच नाही तर, इतरांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यास कोण कोण असेल पात्र :
‘पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न’ या योजनेचा लाभ घेण्याकरिता केवळ जेष्ठच नाही तर, अगदी लहान मुलं देखील फॉर्म भरू शकतात. 10 वर्षाखालील असणाऱ्या वयोगटातील लहान मुला मुलींचे फॉर्म त्यांचे जन्मदाते आई वडील किंवा कायदेशीररित्या जे पालक असतील त्यांना फॉर्म भरावा लागणार आहे. दरम्यान लहान मुल 10 वर्षांचं पूर्ण झाल्यानंतर त्याला स्वतःला पोस्टाचे हे अकाउंट हँडल करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांसारख्या डॉक्युमेंट्ससह स्वतःच सेविंग अकाउंट देखील उघडू शकता.
जाणून घ्या योजनेचा टाईम पिरियड :
पोस्टाच्या या योजनेचा टाईम पिरियड 5 वर्षांचा दिला गेला आहे. पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर तुम्हाला व्याजदराची चांगली रक्कम कमावता येऊ शकते. दरम्यान या योजनेत मुदत वाढीचा म्हणजेच अकाउंट एक्सटेंड करण्याचा कोणताही नियम नाही. तरीसुद्धा तुम्हाला पोस्टाच्या या सिक्रेट योजनेचं अकाउंट आणखीन पुढे सुरू ठेवायचं असेल तर, जमा झालेली सर्व रक्कम काढून तुम्हाला आणखीन एक नवीन अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करावे लागतील.
किती रक्कम मिळणार :
सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवा की, पोस्टाच्या योजनेत तुम्ही सिंगल आणि जॉईंट अकाउंट उघडू शकतात. परंतु दोन्हीही अकाउंटसाठी वेगवेगळ्या मर्यादा दिल्या गेल्या आहेत. समजा सिंगल खातेदाराने पोस्टाच्या या योजनेत पाच वर्षांकरिता 9,00,000 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर, 7.4% या व्याजदराने तुम्ही प्रत्येक महिन्याला 5,550 रुपये पेन्शन प्राप्त करू शकता. दरम्यान जॉईंट खात्यामध्ये पती-पत्नी मिळून तुम्ही एकूण 15,00,000 लाखांची गुंतवणूक करत असाल तर, व्याजदरानुसार 9,250 रुपये प्रत्येक महिन्याला कमवू शकता. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर कोणताही इन्कमसोर्स नसलेल्या व्यक्तींसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या आणि घरबसल्या पैसे कमवा.