15 December 2024 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स उच्चांकी पातळीवर, पुढे शेअर तेजीत राहणार, शेअर्सबाबत मोठी अपडेट

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर स्टॉक 3 टक्क्यांच्या वाढीसह 252.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज टाटा पॉवर स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे.

7 सप्टेंबर 2022 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 251 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. काल या शेअरने 252.50 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आज शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.74 टक्के घसरणीसह 247.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी Tata Power Renewable Energy ने Tata Motors कंपनीसोबत पॉवर खरेदी करार केला आहे. यामुळे टाटा समूहाचा भाग असलेल्या TPREL या इंटिग्रेटेड पॉवर युटिलिटी कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत होते. अवघ्या काही दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 10 टक्के वाढली आहे. TPREL ही कंपनी मुख्यतः अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी एक आघाडीची कंपनी मानली जाते.

टाटा पॉवर कंपनीने एप्रिल-जून 2023 तिमाहीत निव्वळ नफ्यात 29 टक्के वाढ साध्य केली आहे. टाटा पॉवर कंपनीने सलग 15 व्या तिमाहीत देखील सकारात्मक निव्वळ नफा नोंदवला आहे. या कंपनीने मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत 5.8 टक्के वाढीसह 15,485 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

कंपनीचा EBITDA 43 टक्के वाढीसह 3,005 कोटी रुपयेवर पोहचला आहे. रेटिंग एजन्सी ICRA आणि CARE रेटिंग्सने टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सवर ‘AA पॉझिटिव्ह’ रेटिंग दिली आहे. TPREL कंपनीच्या शेअरवर दिलेली रेटिंग टाटा पॉवर कंपनीच्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये झालेल्या सुधारणेला अनुसरून दिली आहे.

टाटा पॉवर कंपनीने नुकताच झूमकार या कंपनीसोबत एक डील केली आहे. टाटा पॉवर कंपनीची ईव्ही चार्जिंग सोल्युशन्स लिमिटेड आणि झूमकार यांनी एक व्यापारी करार केला आहे. टाटा पॉवर कंपनी या करारांतर्गत देशभरात EV चार्जिंग सुविधा प्रदान करणार आहे.

टाटा पॉवर कंपनी आपल्या इझी चार्जिंग स्टेशन्सच्या माध्यमातून ईव्ही चार्जिंग पॉइंट सुविधा प्रदान करणार आहे. यामध्ये देशातील अनेक महामार्ग, देशभरातील 350 शहरांमध्ये 50,000 पेक्षा जास्त होम चार्जर स्थापन केले जाणार आहेत आणि कंपनीतर्फे 4370 सार्वजनिक आणि अर्ध सार्वजनिक ठिकाणी देखील चार्जिंग पॉइंटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. टाटा पॉवर कंपनी EV बससाठी देखील 250 चार्जिंग पॉइंट बनवणार आहे. टाटा पॉवर कंपनीने 2028 पर्यंत पूर्ण भारतात 25,000 चार्जिंग पॉइंटस सुरू करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price today on 25 August 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x