
Post Office Scheme | पूर्वीच्या काळी लोकांकडे केवळ नोकरीचे साधन होते परंतु बचतीच्या साधनांविषयी फार काही लोकांना ठाऊक नव्हते. आताच काळ पूर्णपणे वेगळा आहे. आत्ताचा तरुणवर्ग नोकरीला लागताच सर्वात पहिले बचतीचा मार्ग शोधतात. वाढती महागाई लक्षात घेता बचत करणे अत्यंत गरजेचे आहे नाहीतर तुमचं भवितव्य उज्वल होण्याऐवजी अंधारलेलं होईल.
सध्याच्या घडीला गुंतवणुकीचे वेगवेगळे माध्यम बाजारात उपलब्ध आहेत. यांपैकी काही लोक शेअर बाजारात गुंतवणूक करून कोट्यधीश होत आहेत. परंतु बराच असा सर्वसामान्य वर्ग देखील आहे ज्याला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय अतिहिताचा वाटतो.
यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस योजनांचा नक्कीच विचार करू शकता. दरम्यान आज या बातमीपत्रातून आम्ही तुम्हाला ही माहिती देणार आहोत की, पोस्टाची एक अतिशय खास योजना आहे जी एसबीआय बँकेतील एफडीपेक्षा देखील जास्तीत जास्त नफा मिळवून देत आहे.
पोस्ट ऑफिस आणि एसबीआय बँकेचे व्याजदर :
एसबीआय बँकेत 5 वर्षांसाठी 6.5 टक्के व्याजदर दिले जात आहे. अशातच एकीकडे पोस्ट ऑफिस TD म्हणजे टाईम डिपॉझिट योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 7.5% व्याजदर दिले जात आहे. पोस्टाची टीडी ही बँकांच्या एफडीप्रमाणेच काम करते. परंतु पोस्टामध्ये तुम्हाला सर्वाधिक व्याजदराचा फायदा अनुभवायला मिळतो. महत्त्वाचं म्हणजे पोस्टाची योजना ही सरकारी योजना असल्याकारणाने तुम्हाला यामध्ये सुरक्षिततेची 100% हमी मिळते.
कॅल्क्युलेशनचे एक उदाहरण पहा :
समजा तुम्ही एसबीआयच्या एफडीमध्ये 5 वर्षांसाठी 5 लाखांची रक्कम गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 6,90,209 रुपये मिळतील. दरम्यान एकीकडे पोस्टाच्या टीडीमध्ये 5 वर्षांसाठी 5 लाखांची रक्कम गुंतवत असाल तर, तुम्हाला मॅच्युरिटी पिरियडपर्यंत 7,24,974 लाख रुपये मिळतील. म्हणजेच सारख्याच कालावधीत आणि सारख्याच गुंतवणुकीत पोस्टाची योजना तुम्हाला जास्तीचे 34,765 रुपये मिळवून देते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.