27 April 2024 6:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Post Office Scheme | प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम हवी आहे का?, पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा

postal insurance scheme

Post Office Scheme | पोस्ट ऑफिस गुंतवणूक हा गुंतवणुकीचा असा एक प्रकार आहे, जिथून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवू शकता. भारतातीय लोकसंख्येतील एक मोठा वर्ग जो क्रिप्टो करन्सी, स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवणे टाळतात. ते असे पोस्ट ऑफिस सारख्या लहान गुंतवणुकीचे पर्याय निवडू शकतात, यात बाजारातील जोखीम तुमच्या गुंतवणुकीच्या पैशांवर कोणताही परिणाम करत नाहीत आणि दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास परतावाही चांगला मिळतो.

आज या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका जबरदस्त बचत योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या गुंतवलेल्या पैशावर चांगला व्याज परतावा मिळेल. पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेचे नाव “मासिक उत्पन्न योजना” असे आहे. तुम्ही या बचत योजनेत कमीत कमी पैशात गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधाही आणि लाभ देखील मिळतील. या योजनेत गुंतवणूक केल्यावर दर महिन्याला तुमच्या खात्यात व्याज परतवा येईल. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

गुंतवणूक मर्यादा :
पोस्ट ऑफिसच्या या लघु बचत योजनेत तुम्ही किमान 1 हजार रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही एकच खाते उघडल्यास, तुम्ही त्यात जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही या योजनेत संयुक्त खाते उघडले तर तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता.

व्याज परतावा :
सध्या, पोस्ट ऑफीस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक केल्यास त्यावर तुम्हाला 6.6 टक्के व्याज परतावा मिळेल. हा व्याज परतावा दर महिन्याला गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केला जातो. या योजनेत 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही अल्पवयीन व्यक्ती स्वतःच्या नावावर खाते उघडू शकतो.

योजना कालावधी :
मासिक उत्पन्न योजनेत गुंतवलेले पैसे 1 वर्षापूर्वी काढता येत नाहीत. म्हणजे तुम्हाला गुंतवलेले पैसे किमान एक वर्ष खात्यात ठेवावेच लागतील. तुम्ही खाते उघडल्यानंतर किमान एक वर्षानंतर आणि तीन वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, तुम्हाला मूळ गुंतवणुकीच्या रकम 2% वजा केली जाईल. दुसरीकडे, जर तुम्ही तुमचे खाते 3 वर्षांनंतर आणि 5 वर्ष पूर्ण होण्याआधी बंद केले, तर मूळ रकमेपैकी 1% रकम वजा केली जाईल आणि तुमची शिल्लक रक्कम परत दिली जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post Office Scheme with huge monthly return and benefits on 28 July 2022.

हॅशटॅग्स

insurance scheme(1)postal insurance(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x