मल्टीप्लेक्सच्या मनमानीचा मनसेकडून निषेध. खाद्यपदार्थांसाठी अव्वाच्या सव्वा दर लावण्याचं लाॅजिक काय? प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांना मनसे चित्रपट कर्मचारी सेनेने वाचा फोडली आहे. अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली.अॅड.किशोर शिंदे,महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी, पुणे संघटक सागर पाठक आणि मनसैनिकांनी पुण्यातील PVR वर धडक दिली. पाच रुपयांचे पाॅपकाॅर्न २५० रुपयांना कसे? १० रुपयांचा वडापाव शंभर रुपयांना कसा? असे फलक घेऊन आणि घोषणा देऊन मनसैनिकांनी PVR दणाणून सोडलं.

MNS protest in Pune PVR Multiplex for High Food Pricing