30 November 2022 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा Multibagger Stocks | पैसा कोणाला नको! हे 20 शेअर्स 530 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, स्टॉक लिस्ट पहा, खरेदी करणार? Horoscope Today | 30 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Quick Money Share | काय सांगता! या टॉप 5 शेअर्सनी 5 दिवसात 53 पर्यंत परतावा दिला, शेअर्स नोट करा, पैसा वाढवा Gold Price Today | आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील लेटेस्ट दर तपासून घ्या SBI Recruitment 2022 | एसबीआय बँकेत (मुंबई) भरती, ऑनलाईन अर्ज करा
x

पुणे: २०१४ पासून भाजपच्या मोबाईल टॉर्च इव्हेन्टला अनेक शहरं फसली; नंतर विकासाला मुकली?

PM Narendra Modi, Maharashtra Vidhansabha Election 2019, BJP

पुणे: पंतप्रधान नरेंद्र यांची काल पुण्यात विधानसभेच्या निमित्ताने सभा पार पडली. वास्तविक प्रसार माध्यमांचे कॅमेरे मोदींच्या दिशेने असले तरी सभेत पुढचा काही भाग सोडल्यास रिकाम्या खुर्च्यांची खच मात्र सहज नजरेस पडत होता. सभेला संबोधित करताना मोदींनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं. त्यात ते असं म्हणाले की, ‘सरकार येऊन आता कुठे ५ महिने झाले आहे आणि खूप काही करायचं आहे’, यावरून मोदींना केंद्रात भाजपचं सरकार मागील सलग साडेपाच वर्षांपासून असल्याचा विसर पडल्याचं दिसून आलं.

भारतीय जनता पक्षाच्या सभांमध्ये अनेक विषय आधीच निश्चित करण्यात आलेले असतात, ज्याचा नंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठा प्रचार केला जातो. त्यातीलच एक म्हणजे सभेतील एक ठराविक ग्रुप मोदींच्या दिशेने हात उंचावत स्वतःच्या हातातील मोबाईल मधील टॉर्च चालू करून हात उंचावतात आणि त्यांचं अनुकरण इतर उपस्थित करतात. असे तंत्र भाजपाची प्रचार यंत्रणा केरळ ते पुणे सर्वत्रच करताना दिसली आहे. पुण्यात देखील २०१४ मध्ये हात उंचावत स्वतःचा मोबाईल मधील टॉर्च ऑन करण्याचं आवाहन फडणवीसांनी केलं होतं आणि त्यावरच मोदींनी भाषणात काही वेळ दिला आणि प्रसार माध्यमांनी देखील त्याचे उत्तर हेडलाईन मॅनेजमेंट केल्याचे आजही सर्वश्रुत आहे. तोच प्रयोग मोदींनी पुन्हा कालच्या म्हणजे २०१९ मधील प्रचारात देखील केला आणि त्यावर पुन्हा हेडलाईन मॅनेजमेंट केल्याचे दिसत आहे. अगदी हेच प्रयोग अनेक वर्ष आणि अनेक शहरांमध्ये करण्यात येत असून त्यात त्या शहरांना वर्षानुवर्षे काही हाताला लागलेलं पाहयला मिळत नाही.

#VIDEO: देशातील इतर शहरांमध्ये देखील भाजपाची प्रचार यंत्रणा तेच वातावरण निर्मितीचे फसवे प्रयोग करत असते;

विशेष म्हणजे मागील ५ वर्षात भाजपने पुण्यात कोणती विकासाची कामं केली याचा कोणताही हिसाब त्यांनी पुणेकरांना दिला नाही. त्यात भाजपच्या पुण्यातील खासदार आणि आमदारांची विकासाची कामं सांगावी असं काहीच नसल्याने मोदींनी ५ महिन्याचं सरकार असल्याचं सांगून पळवाट काढल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे कलम ३७० विषयावर मोदी बोलणार आणि त्यासाठी मोदी-मोदी-मोदी असं ओरडून प्रसार माध्यमांवर वातावरण निर्मिती करणारी इव्हेन्ट टीम आधीच सज्ज करण्यात आली होती. असाच प्रयोग २०१४ भाजपने केला होता आणि त्यालाच नेमकी पुणेकर मंडळी भुलली होती. मात्र प्रत्यक्षात सरकार आल्यावर पुण्यात मागील ५ वर्ष जैसे थे परिस्थिती आहे. किंबहुना शहरात अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांची पूर्वी पेक्षा अधिक वाईट स्थिती असल्याचं अनेक पुणेकर सांगतात.

मोदी सभेत म्हणाले की, मागील ७० वर्षांपासून ‘एक देश, एक संविधाना’च्या आड ३७० कलम येत होतं. हे कलम काढून टाकण्याच्या गप्पा खूप झाल्या. पण कृती कोणी केली नाही, असे नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणताच मोदी मोदीचा जयघोष केला. लोकांचा उत्साह पाहून मोदींनी आपले भाषण थांबवत पुणेकरांना अभिवादन केले. पुण्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

३७० कलम काढून टाकल्याने देश एकसंध झाल्याचे देखील ते यावेळी म्हणाले, तसेच हे कलम काढून टाकणे जम्मू काश्मीर, लढाखच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक होते असेही ते म्हणाले. मोदींचे आगमन होताच भव्य हाराच्या माध्यमातून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मोबाईलचा टॉर्च लावून उपस्थित नागरिकांनी मोदींना अभिवादन केले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1662)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x