14 November 2019 12:07 AM
अँप डाउनलोड

हडपसर: मनसेचे वसंत मोरे यांचा शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल; तुफान गर्दी

MNS Vasant more, MNS Corporator Vasant More, Raj Thackeray, Maharashtra Vidhansabha Election 2019

हडपसर: मनसेचे पुण्यातील विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यांनी हडपसर मतदारसंघातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज आज दाखल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सध्या प्रसार माध्यमं गृहीत धरत असली, तरी अनेक मतदारसंघातील त्यांची तगडी फिल्डिंग लागल्याचे प्रथम दर्शनी दिसते. त्यातीलच एक म्हणजे, मनसेचे पुण्यातील विद्यमान नगरसेवक वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांचे लाडके तात्या हडपसर विधानसभा मतदारसंघात मोठी फिल्डिंग लावून आहेत. त्यांची मागील काही महिन्यांपासूनची तयारी पाहता स्वतः राज ठाकरेंनी तयारीला लाग असे आदेश आधीच दिले आहेत, असच म्हणावं लागेल.

पुणे महापालिकेत एक वजनदार नगरसेवक तसेच अनेक विकास कामांमधून सामान्य पुणेकर आणि कार्यकर्त्यांशी जोडले गेल्याने, त्यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा झाल्यास नवल वाटायला नको. दरम्यान निवडून येण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी म्हणजे अर्थकारण, स्थानिक मनसे पदाधीकारी व कार्यकर्त्यांची भावनिक दृष्ट्या स्वतःसोबत बांधली गेलेली फळी आणि स्व-पक्षातील तसेच इतर स्थानिक नगरसेवकांशी असलेले राजकीय संबंध, त्यांच्या पथ्यावर पडू शकतात.

हडपसर येथे त्यांनी सर्वच धर्मियांना मनसे आणि स्वतःसोबत जोडण्याचा जोरदार धडाका लावला असून, त्याला जागोजागी प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दुसरं म्हणजे तात्यांच्या व्यक्तिमत्वावर कार्यकर्ते फारच फिदा असल्याचं दिसतं आणि त्यामुळे तात्यांनी आदेश द्यावा आणि आम्ही मैदानात उतरायचं एवढंच कार्यकर्त्यांना माहित. त्यामुळे सध्याच्या राजकारणात निवडून येण्यासाठी जे जे आवश्यक असतं, ते सर्व विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडे असल्याने, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तात्या हडपसर मतदारसंघात धुमाकूळ घालणार असच सध्याच राजकीय चित्र आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(471)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या