13 July 2020 6:22 AM
अँप डाउनलोड

अमृता फडणवीस यांनी आता माजी मुख्यमंत्र्यांना धीर द्यायला हवा: रुपाली चाकणकर

CM Uddhav Thackeray, Amruta Fadnavis, NCP Leader Rupali Chakankar

पुणे: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यात सत्तापालट झाल्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अमृता फडणवीस यांनी वारंवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना, ‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे’ अशी घणाघाती टीका केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तर हा उद्धव ठाकरेंचा द्वेष करणारा मजकूर फडणवीसांची मुलगी दिविजाने लिहिल्याची चर्चा होत आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, मी बंगला सोडताना कोपरा कोपरा पाहिलेला आहे. यामुळे तिने असे केलेले नाही, असे म्हटले आहे. तसेच हे आपल्याविरोधातील षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. तिथे स्टाफही राहतो. त्यांच्या खेळणाऱ्या मुलांपैकी कोणीतरी केले असेल. तर अमृता फडणवीस यांनी यावर खुलासा करताना आम्ही महिन्य़ापूर्वीच वर्षा बंगला सोडला आहे. बंगला सोडताना सगळं तपासलेले होते. त्यानंतर एकदाही तिथे गेलेलो नाही. हे लिखाण दिविजा किंवा अन्य कोणी केलेले नाही, असे म्हटले आहे.

दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘काहीही वक्तव्य करून प्रकाशझोतात येण्याचा निष्फळ प्रयत्न सध्या अमृता फडणवीस या करत आहेत. पण त्यांनी आता शब्दांना आवर घालून अशी वक्तव्य करणं टाळायला हवं. मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीही योगदान दिलेलं नाही. मात्र आता वैफल्यग्रस्त मानसिकतेतून त्या आरोप करत आहेत. त्यांनी आता माजी मुख्यमंत्र्यांना धीर द्यायला हवा,’ अशी खोचक टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

 

Web Title:  NCP Leader Rupali Chakankar Slams Amruta Fadanvis over targeting CM Uddhav Thackeray.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amruta Fadnavis(22)#NCP(296)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x