6 October 2022 6:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bigg Boss 16 | 'बिग बॉस 16' मध्ये इंस्टाग्राम फेम किली पॉलची होणार वाइल्ड कार्ड एण्ट्री, व्हिडीओ व्हायरल Multibagger Stocks | मागील दसऱ्याला या 44 शेअर्समध्ये लोकांनी पैसे गुंतवले, या दसऱ्याला मल्टिबॅगर परतावा मिळाला, स्टॉकची यादी सेव्ह करा Numerology Horoscope | 07 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Tips To Reduce Dark Circles | महागड्या क्रिम्सने सुद्धा डोळ्याखालील डार्क सर्कल दुर होतं नाहीत?, नैसर्गिकरित्या घालवण्यासाठी या टिप्स फॉलो करा SBI ATM Rule | तुम्ही एसबीआय एटीएम वापरता?, रोख रक्कम काढली तर तुम्हाला 173 रुपये द्यावे लागतील असा मेसेज आला? Surya Grahan 2022 | या तारखेला होणार सूर्यग्रहण, ज्योतिषशास्त्रानुसार या 5 राशींच्या लोकांच्या नशिबाची दारं उघडतील SIP Calculator | म्युचुअल फंड SIP मध्ये दरमहा 1000 रुपये गुंतवा, 2 कोटीचा बंपर परतावा कसा मिळेल ते गणित समजून घ्या
x

बोरघाटात खासगी बसचा अपघात, ५ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी

Bus Accident, Mumbai Pune Highway Borghat

खंडाळा: दोन वेगवेगळ्या अपघातमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात दुर्घटना घडली आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा गारमाळ इथे भरधाव खासगी बसचा भीषण अपघात झाला. बस चालकाचा ताबा सुटल्याने तीव्र वळणावरून बस ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली. सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सातारा कराड इथून ही खाजगी बस मुंबईकडे जात असताना दुर्घटना घडली. अपघातामध्ये बसमधील सीट तुटल्याने अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले तर चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्युमुखींमध्ये दोन महिला एक पुरुष तर एक दोन वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. अपघातानंतर ३० ते ३५ जखमींना तळेगाव, निगडी, पनवेल, तसेच खोपोली येथील विविध रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये एका अडीच वर्षीय बालकासह, एक युवती, एक पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे. सर्वज्ञा सचिन थोरात (वय २- कराड), स्नेहा पाटील (वय-१५, घाटकोपर), जनार्दन पाटील (वय-४५), संजय शिवाजी राक्षे (वय-५०, पवई), आणि एका महिलेची ओळख पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक समाजसेवकांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवले.

दिवाळीच्या सुट्ट्या संपून आजपासून बऱ्याच शाळा आणि ऑफिस सुरु होणार आहेत, त्यामुळे सुट्टीसाठी गावी गेलेल्या आणि कामासाठी परतत असणाऱ्या प्रवाशांचा यात जास्त सहभाग होता. मृतांमध्ये तीन महिन्यांची चिमुकली आणि १५ वर्षांची एक विद्यार्थिनी होती, याच विद्यार्थिनीच्या वडीलांचाही मृतांमध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x