अहमदनगर : ‘मी-टू’ मोहिमेंतर्गत मागील काही दिवसांपासून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यात अनेक कलाकार, राजकारणी आणि पत्रकारांची सुद्धा नाव पुढे आल्याने मोठी खळबळ माजली होती. दरम्यान १०-१५ वर्षांनी बाहेर येणारी ही प्रकरणं बघून अनेकांनी संशय सुद्धा व्यक्त केला होता. परंतु काही दिवसामध्ये या मोहिमेचा अतिरेक होत आहे असे वाटू लागल्याने ही मोहीम जास्त दिवस टिकणार असे एकूणच वातावरण झाले आहे. आता सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे सिंधुताईंनी सुद्धा या विषयावर मत व्यक्त केलं आहे.

सिंधुताईं या विषयावर बोलताना म्हणाल्या की, पण १०-१० वर्षांनी आरोप करणं हे चुकीचं आहे, शिवाय अत्याचार होतो तेव्हाच त्यावर बोलायला हवं असं त्या स्पष्ट म्हणाल्या. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव येथे उत्कर्ष या मल्टीस्टेट पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिम्मित सिंधुताई आल्या असता त्यांनी या विषयावर भाष्य केलं.

१०-१५ वर्षांनी आरोप केल्यामुळे जे दोषी नाहीत त्यांना सुद्धा नाहक शिक्षा भोगावी लागत आहे. आरोप करणारी महिला कुणाचीतरी पत्नी, बहीण किंवा आई आहे. तसेच पुरुष सुद्धा कुणाचा तरी मुलगा, भाऊ आणि वडील आहे, याच भान ठेवावं असं ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई म्हणाल्या.

Me too raise your voice at the time of sexual harassment says sindhutai