मुंबई ५ ऑगस्ट : गटारी स्पेशल मेनू करायचा आहे तर तुमच्या मेनू मध्ये अजून एक मेनू ऍड करा तो म्हणजे चिकन बिर्याणी . त्याचे साहित्य आणि पाककृती खालीलप्रमाणे आहे

साहित्य :

* 1 टेबलस्पून खडा मसाला (लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र, हिरवी वेलची,)
* 5 टेबलस्पून + 1 टीस्पून तेल
* 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला (घरघुती ठेवणीतला)
* 1 टेबलस्पुन लाल तिखट
* 1/2 लिंबू
* 1 टेबलस्पून पुदिना पाने
* 1 टेबलस्पून कोथिंबीर
* 1/2 कप दही
* 2 हिरव्या मिरच्या
* 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट
* 2 कांदे
* 1 टोमॅटो
* 2-3 कांदे गोल्डन फ्राय करून
* 1 टीस्पून हळद
* 250 ग्रॅम चिकन
* 2-3 कप इंद्रायणी तांदूळ
* मीठ चवी नुसार
* पाणी आवश्यक ते नुसार

कृती :
१.
चिकन मीठ, हळद लावून स्वच्छ धून घ्या. नंतर त्यात दही, बिर्याणी मसाला, मीठ, तिखट, आले लसूण पेस्ट लावून 30 मिनीटे झाकून ठेवा

२. आवश्यक ते नुसार पाणी उकळायला ठेवा, नंतर त्यात 1 टीस्पून तेल, आणि सगळा खडा मसाला घाला, मीठ, लिंबू पिळून घ्या व धून घेतलेले तांदूळ त्यात घाला व 50% शिजवून घ्या, व ते पाणी गाळणी वर गाळून काढून घ्या, व ते नंतर वापरा.

३. आता कुकर मध्ये तेल, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, हळद घालून थोडे परतून घ्यावे, व नंतर त्यात मारीनेड केलेले चिकन घालून तेल सुटे पर्यंत परतून घ्यावे. तांदुळाचे गाळून घेतलेलं पाणी / आवश्यक ते नुसार, घाला

४. त्या मध्ये 50% शिजवून घेतलेला भात घाला, त्यावर फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना घाला व कुकर चे झाकण लावून 4 शिट्या करा, नंतर गॅस बंद करा. चिकन बिर्याणी तयार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Chicken Biryani recipe in Marathi news updates.

Special Recipe | झणझणीत चिकन बिर्याणी रेसिपी – ट्राय करा