9 May 2025 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मंदीत संधी, स्वस्तात मिळतोय या कंपनीचा शेअर, संयम ठेवल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: SUZLON 7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल Cheque Bounce Alert | चेकने पेमेंट करणाऱ्या 90% लोकांना माहित नाही, ही चुका करू नका, सर्वकाही गमावून बसाल EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार
x

Special Recipe | झणझणीत खानदेशी शेव भाजी बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी

Khandeshi Shev Bhaji recipe

मुंबई, २४ जुलै | एखाद्या झणझणीत पदार्थाची डिश घरात अनेकांना आवडत असते. त्यात राज्यातील एखाद्या भागातील प्रसिद्ध अशी डिश म्हटल्यावर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. त्यात जर ती डिश झणझणीत खानदेश शेव भाजीची असेल तर बातच निराळी म्हणावी लागेल. चला तर आज हटके डिश झणझणीत खानदेश शेव भाजी बनवूया…

संपूर्ण साहित्य:
* 1 वाटी शेव
* 2 कांदे
* ५-६ लसूण पाकळ्या
* २ आले चे तुकडे
* ५-६ सुके खोबरे च्या तुकडे
* ७-८ कढीपत्त्याची पाने
* 1 टीस्पून लाल तिखट
* १/८ टीस्पून हळद
* 1/4 टीस्पून जीरे
* १/४ टीस्पून मोहरी
* १/८ टीस्पून गरम मसाला किंवा काळा मसाला
* १/८ टीस्पून धणे पूड
* 1 चिमूट हिंग
* बारीक चिरलेली कोथिंबीर
* २ टेबलस्पून तेल कमी जास्त करु शकतो
* चवीनुसार मीठ घालावे

संपूर्ण कृती:
१. प्रथम आपण कांदे चिरून घ्यावे मग एक कढ ईमधे तेल घालून त्यात कांदे,सुके खोबरे, लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडे, हे सर्व मिश्रण तेल मध्ये भिजून घ्यावे मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे

२. कढई मध्ये तेल घालून त्यात कढीपत्त्याची पाने, हिंग, जीरे, मोहरी घालून फोडणी तडतडल्यावर त्यात बारीक वाटून घेतले मसाला घालून परतावे मग त्यात धणे पूड, लाल तिखट, हळद, गरम मसाला, आणि चवीनुसार मीठ घालावे व थोड्या वेळ परतून झाल्यावर त्यात गरम पाणी घालावे

३. रस उकळून घ्यावे नंतर त्यात शेव घालून गॅस बंद करावा आपली झणझणीत खान्देशी शेवभाजी तयार आहे एक वाटी मध्ये काढून वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे मस्त

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Khandeshi Shev Bhaji recipe in Marathi news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या