Modak Roll Recipe Madhura Swad | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' - नक्की ट्राय करा
मुंबई, १४ सप्टेंबर | बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. गणेशोत्सव म्हटलं की नैवेद्यात सर्वात आधी तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे मोदक. मोदकाचे अनेक प्रकार आहेत घरोघरी अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे मोदकही तयार केले जातात. पण मोदक तयार करणे प्रत्येकालाच जमते असे नाही. बऱ्याचदा मोदक करण्यासाठी (Modak Roll Recipe Madhura Swad) केलेले प्रयत्न फसतो. ज्यांना मोदक तयार करणे कठीण वाटते किंवा तयार करता येत नाही अशासाठी आज आम्ही खास रेसिपी घेऊन आलो आहे. मोदकासारखंच तुम्ही मोदक रोल तयार करु शकता. हे मोदक रोल देखील कमी साहित्यात आणि झटपट तयार होतात. त्यामुळे मोदक तयार करता येत नाही म्हणून नाराज न होता तुम्ही मोदकाचे रोल तयार करुन बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. चला तर मग मोदक रोल कसे तयार करायचे हे जाणून घेऊया…
Modak Roll Recipe Madhura Swad. Today we have come up with a special recipe for those who find it difficult or cannot make Modak. You can make Modak rolls just like Modak :
उकड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:
* दीड कप पाणी (One and a half cup of water)
* दीड कप तांदळाचे पीठ (One and a half cups of rice flour)
* अर्धा चमचा मीठ (Half a teaspoon of salt)
* एक चमचा साजूक तूप (A tablespoon of ghee )
सारण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:
* एक चमचा साजूक तूप (tablespoon of ghee)
* सुका मेवा (काजू आणि बदामाचे तुकडे) (Dried nuts (cashew nuts and almond pieces))
* एक कप ओल्या नारळाचा चव
* अर्धा कप गूळ (Half a cup of jaggery)
* वेलची पूड ( Cardamom powder)
* जायफळ पूड (Nutmeg powder)
मोदक रोलसाठी असं तयार करा पीठ:
सर्वात आधी एका ताटामध्ये उकड घ्या. ही उकड चांगली मळून त्याचा गोळा तयार करुन घ्यायचा.
सारण तयार करण्याची पद्धत:
एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घ्या. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये सुका मेवा (काजू आणि बदामचे तुकडे) टाका. सुकामेवा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये ओल्या नारळाचा चव टाका. नारळाचा चव चांगला भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप गूळ टाका. सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन घ्या. त्यानंतर यामध्ये वेलची पूड किंवा जायफळ पूड टाका. अशा पद्धतीने तयार होईल सारण.
असे तयार करा मोदक रोल:
पीठाचा एक मोठा गोळा तयार करुन घ्या. हा पीठाचा गोळा पोळपाटावर ठेवून तांदळाचे सुकं पीठ लावून लाटण्याच्या सहाय्याने तो त्याची पोळी तयार करुन घ्या. थोडीशी साडसर पोळी लाटून घ्या. या पोळीवर चारही बाजूने व्यवस्थित सारण पसरवून घ्या. त्यानंतर उळू वडीप्रमाणे रोल तयार करुन घ्या. एका स्टिमरच्या डिशवर तुम्ही केळीचे पान ठेवून या रोल ठेवा आणि स्टिमरमध्ये हे रोल दहा मिनिटं उकडून घ्या. त्यानंतर या रोलचे बारीक तुकडे करुन घ्या. गार्निशसाठी यावर पिस्त्याचे तुकडे तुम्ही लावू शकता. हे रोल दिसायला खूपच सुंदर दिसतात आणि खायला देखील खूप टेस्टी लागतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Recipe Title: Modak Roll recipe Madhura Swad in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News