मुंबई, ०५ जुलै | घरच्या घरी काही मसालेदार आणि चमचमीत खाण्याची मजा काही वेगळीच असते. त्यात पावसाळ्याचे दिवस म्हणजे सोने पे सुहागा असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आज भाताचा वेगळा प्रकार ट्राय करायचा असेल तर कोयंबतूर टोमॅटो भात करून बघायला हरकत नाही.
संपूर्ण साहित्य:
* दोन वाटी तांदळाचा शिजवलेला भात
* तीन चमचे तेल
* चमचाभर मोहरी
* अर्धा चमचा जिरं
* कढीपत्त्याची सात ते आठ पानं
* दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या
* चिमूटभर हिंग
* अर्धा चमचा मिरपूड
* एक वाटी टोमॅटो प्युरी
* एक चमचा लाल तिखट
* अर्धा चमचा गरम मसाला
* आक्रोडाचे तुकडे अर्धा कप
* अर्धा चमचा हळद आणि मीठ
संपूर्ण कृती:
* एका कढईत तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी घालून तडतडू द्या.
* मग जिरं घाला. त्यानंतर कढीपत्ते, हिंग आणि लाल मिरच्या घालून परता.
* मग आक्रोडाचे तुकडे आणि टोमॅटो प्युरी घालून परतून घ्या.
* टोमॅटो थोडा शिजल्यानंतर लाल तिखट गरम मसाला आणि हळद घाला.
* सर्व मसाले शिजून तेल सुटू लागल्यावर चवीनुसार मीठ घाला.
* त्यात शिजवलेला भात घालून सर्व घटक नीट मिसळून घ्या.
* वरून कोथिंबिर घाला आणि गरमागरम खा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Tomato rice recipe in Marathi news updates.
