2 May 2025 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Ind Vs Eng 2nd Test | अश्विनने ५ बळी टिपले | दुसऱ्या दिवसअखेर भारत १ बाद ५४

Ind Vs Eng, 2nd Test Live, R Ashwin

चेन्नई, १४ फेब्रुवारी: पहिल्या डावात भारताने ३२९ धावा केल्यानंतर इंग्लंडचा डाव अवघ्या १३४ धावांमध्ये आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेत पहिल्या डावाअखेर भारताला १९५ धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर शुबमन गिल (१४) लवकर बाद झाला. पण रोहित शर्मा (२५*) आणि चेतेश्वर पुजारा (७*) या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली आणि भारताला २४९ धावांची आघाडी मिळवून दिली.

सकाळच्या सत्रात टीम इंडियाचे तळाचे चार फलंदाज २९ धावाच करू शकले. रिषभ पंत ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडच्या मोईन अली ४, ऑली स्टोन ३ आणि जॅक लिच यानं २ विकेट्स घेतल्या.

इंशात शर्मानं पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. त्यानंतर पदार्पणवीर अक्षर पटेलनं इंग्लंडचा कर्णधार जो रूटला बाद करून मोठं यश मिळवून दिलं.

 

News English Summary: After India scored 329 in the first innings, England’s innings was reduced to 134 runs. Ravichandran Ashwin took five wickets to give India a solid 195-run lead at the end of the first innings. In the second innings, India’s opener Shubman Gill (14) was dismissed early. But Rohit Sharma (25 *) and Cheteshwar Pujara (7 *) batted till the end of the day’s play to give India a 249-run lead.

News English Title:  Ind Vs Eng 2nd Test Live Updates R Ashwin Five Wickets Rohit Sharma news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या