8 May 2024 6:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Ind vs NZ, 1st T20 : पहिल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर विजय

india Vs New Zealand first T20

ऑकलंड : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी २० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला टी २० सामना न्यूझीलंडमधील ऑकलंड इथं होत आहे. या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दरम्यान, अवघ्या ४५ मिनिटात टीम इंडियाचं विश्वविजयाचं स्वप्न भंग करणाऱ्या न्यूझीलंडचा बदला घेण्याची वेळ आली आहे. वन डे विश्वचषक २०१९ मध्ये न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा टीम इंडिया काढते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतापुढे २०४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने रोहित शर्माला झटपट गमावले. पण त्यानंतर मात्र लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी ९९ धावांची भागीदारी रचली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. राहुलने यावेळी ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर कोहली जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. कोहलीला यावेळी अर्धशतकासाठी पाच धावा कमी पडल्या. हे दोघे बाद झाल्यावर भारत हा सामना जिंकणार की नाही, असे वाटत होते. पण त्यानंतर श्रेयस अय्यरने तुफानी अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय पुरता चुकला. सलामीवीर कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील या जोडीने सुरुवातीच्या षटकांपासून फटकेबाजी सुरु केली. न्यूझीलंडमधील छोट्या मैदानांचा फारसा अंदाज न आल्यामुळे भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये स्वैर मारा केला. सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. शिवम दुबेने मार्टीन गप्टीलला माघारी धाडण्यात यश मिळवलं, आणि न्यूझीलंडला पहिला धक्का बसला.

कॉलिन मुन्रो, केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजीकरत ५ बाद २०३ धावा केल्या. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून कॉलिन मुन्रोने सर्वाधिक ५९ धावा केल्या.

 

Web Title:  india Vs New Zealand first T20 India won New Zealand first match.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x