12 August 2020 11:53 AM
अँप डाउनलोड

आयपीएल २०१९: मुंबई इंडियन्सचा पंजाबवर रोमांचक विजय

Mumbai Indian, IPL 2019

मुंबई : आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत पंजाब-मुंबई इंडियन लढतीत पंजाबचा सलामीवीर के.एल. राहुलने काढलेल्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणार्‍या पंजाबने २० षटकांत ४ बाद १९७ धावांची मजल मारली. दरम्यान, नाणेफेक जिंकल्यावर मुंबईचा कर्णधार पोलार्डने प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

परंतु राहुल आणि गेलने तुफानी फटकेबाजी करून त्याचा निर्णय मुंबईसाठी चुकीचा ठरवला असे वाटले होते. मात्र अखेरच्या बॉलपर्यंत श्वास रोखून धरायला लावलेल्या रोमांचक लढतीत मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर एकूण ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे आयपीएल गुणतालिकेत मुंबईने पाचवरून थेट तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे.

पंजाबचे १९७ धावांचे आव्हान पेलताना सुरुवातीलाच मुंबई इंडियाचे गडी लवकर बाद झाले. त्यामुळे मुंबईची चांगलीच दमछाक झाली. परंतु पोलार्डने रोहित शर्माऐवजी आपल्यावर असलेली कर्णधारपदाची जबाबदारी उत्तम पेलली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x