2 May 2025 10:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पोस्टरद्वारे सवाल

Young office bearers, Swabhimani Shetkari Sanghatana, Posters, Sachin Tendulkar house

मुंबई, ०८ फेब्रुवारी: केंद्राने लागू केलेल्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीत २ महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला तरी आंदोलन सुरु आहे. दरम्यान, या मुद्यावरुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्विट केले होते. यावरुन सचिनच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी सचिन तेंडूलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी केली आहे. आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून स्वाभिमानीच्या रणजित बागल याने उपस्थित केला आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला सचिन तेंडुलकरनं ट्विटद्वारे उत्तर दिलं होते. त्यानंतर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणाऱ्यांनी सचिन तेंडुलकरनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यापूर्वी भूमिका का घेतली नाही असा सवाल उपस्थित केला होता. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सचिनला सल्ला दिला होता.

दरम्यान, सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्विटनंतर विविध शेतकरी संघटनांनी आपला रोष व्यक्त केला आहे. तर काही संघटनांनी तर सचिनला दिलेला भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरला विचारला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा पदाधिकाऱ्यांची सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत त्याला प्रश्न विचारला आहे.

 

News English Summary: Farmers have been protesting in Delhi for more than two months against the three agricultural laws implemented by the Center. Meanwhile, master blaster Sachin Tendulkar tweeted on the issue. As a result, farmers’ organizations have become aggressive against Tendulkar. Young office bearers of Swabhimani Shetkari Sanghatana have put up posters outside Sachin Tendulkar’s house. When will you tweet for our farmer dad? This question has been raised by Ranjit Bagal of Swabhimani through this poster.

News English Title: Young office bearers of Swabhimani Shetkari Sanghatana have put up posters outside Sachin Tendulkar house news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sports(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या