30 April 2025 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

Infosys Share Price | इन्फोसिस शेअर चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Infosys Share Price

Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीचे (NSE: INFOSYS) शेअर्स 32 टक्के वाढले आहेत. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सची किंमत 37 टक्के वाढली आहे. (इन्फोसिस कंपनी अंश)

बुधवारी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढून 1936.90 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 8.03 लाख कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.46 टक्के घसरणीसह 1,930.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

बुधवारी इन्फोसिस कंपनीचे 1.43 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 0.7 च्या बीटासह खूपच कमी अस्थिरता दिसून आली. इन्फोसिस स्टॉकचा रिलेटिव स्ट्रेंथ इंडेक्स 68.1 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. इन्फोसिस स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्म PhillipCapital ने इन्फोसिस स्टॉकवर 2140 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की TCS च्या तुलनेत इन्फोसिस कंपनीचे मूल्यांकन कमी होईल. तज्ञांनी इन्फोसिस स्टॉकसाठी किंमत, नियरशोरिंग, ऑटोमेशन, सबकॉन्ट्रॅक्टिंग आणि थर्ड-पार्टी कॉस्ट ऑप्टिमाइझ करणे यासह लीव्हर्सचा उल्लेख केला आहे. तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉक पुढील काळात 2,050 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणून त्यांनी या स्टॉकवर BUY रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रोकरेज फर्म निर्मल बंगच्या तज्ञांनी इन्फोसिस स्टॉकवर ‘ॲक्युम्युलेट’ रेटिंग देऊन 1,985 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. इन्फोसिस कंपनीने जून तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक 7.1 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे या तिमाहीत कंपनीने 6,368 कोटी रुपये नफा कमावला होता.

मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 5,945 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून तिमाहीत इन्फोसिस कंपनीच्या महसूल संकलनात 3.6 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या काळात कंपनीने 39,315 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 37,933 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

News Title | Infosys Share Price NSE: INFOSYS 29 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या