28 April 2024 8:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Amul Organic Wheat Atta | अमूलने आणले ऑर्गेनिक गव्हाचे पीठ | किलोची किंमत किती जाणून घ्या

Amul Organic Wheat Atta

Amul Organic Wheat Atta | गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (जीसीएमएमएफ) या अमूल ब्रँडअंतर्गत उत्पादने देणाऱ्या डेअरी कंपनीने ऑर्गेनिक गव्हाचे पीठ बाजारात आणले आहे. जीसीएमएमएफने सांगितले की, या व्यवसायांतर्गत सुरू करण्यात आलेले पहिले उत्पादन म्हणजे ‘अमूल ऑरगॅनिक होल व्हीट फ्लोअर’. भविष्यात मूगडाळ, तूरडाळ, चणाडाळ आणि बासमती तांदूळ यासारखी उत्पादनेही कंपनी बाजारात उतरवणार आहे.

किंमत किती :
गुजरातमधील सर्व अमूल पार्लर आणि रिटेल आउटलेटमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ऑर्गेनिक पीठ उपलब्ध होणार आहे. जूनपासून गुजरात, दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि पुण्यातही ऑनलाइन ऑर्डर करता येणार आहे. एक किलो पिठाची किंमत ६० रुपये आणि पाच किलो पीठाची किंमत २९० रुपये असेल.

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र आणणार :
सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र आणून या व्यवसायातही दूध संकलन मॉडेलचाच अवलंब करण्यात येणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी यांनी सांगितले. यामुळे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि सेंद्रिय अन्न उद्योग अधिक लोकशाहीवादी होईल.

5 ठिकाणी ऑरगॅनिक चाचणी प्रयोगशाळा :
अमूल’तर्फे देशभरात पाच ठिकाणी सेंद्रिय चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून, त्याचबरोबर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यात येणार आहे. अहमदाबादच्या ‘अमूल फेड डेअरी’मध्ये अशा प्रकारची पहिली प्रयोगशाळा तयार होत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Amul Organic Wheat Atta check price details here 29 May 2022.

हॅशटॅग्स

#Amul(3)#Amul Organic Wheat Atta(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x