शब्द सांभाळताना कविता गर्भार होते
बाजार बसव्यात लेखणी साभार होते,
उणे-दूने काढत बसले शेजारचे माझ्या
अबोल नजरेत व्यावसायिक भार होते,
ठरलं होतं तितकं ठरवलंही होतं माझं
जरासं किणकिणत तू उघडलं दार होते,
माफीचा अजूनही प्रश्न किंवा उत्तर नाही
माझं वेड मन तेव्हाही एवढेच उदार होते,
आल्या पावली निघून गेलीस तू आजही
त्या पैंजणीला माझे अखेरचे आभार होते..!
लेखक: पियुष खांडेकर
