3 May 2025 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

सांज किनारा..!

Marathi Stories, Marathi Laghu Katha, Marathi Kavita, Marathi Bhay Katha, Marathi Sahitya

ती त्याची वाट बघत सारखी ये-जा करत होती. वेळ झाली होती त्याच्या येण्याची पण उगाच तिची नजर भिरभिरत होती. सांजेचा रवि पुन्हा तिच्या हातांवरच्या मेहंदीचा रंग नभावर उधळत होता. फिक्कट पुसट होत किनारा वारा दमट होत होता.

अजुन कसा आला नाही. कुठे राहिला हा! नेमकं वेळे आधी हजर असलेला एखाद वेळेस चुकला तर होता-होईल तितका त्रागा-शंका-कुशंका वरचे-वर मनात डोकावत राहातात. धावत येत असलेल्या लाटेसोबत सावकाश तो ही तिच्या मागे तिच्या नकळत येतो.

डोळ्यांवर हात ठेवून खर्जातला आवाज अजुन खर्जात नेवून बोलतो “ओळख पाहू”. तिची वैतागलेली पाकळी त्याच्या स्पर्शाने मोहरुन खुलून येते. एका हातात त्याने लपवलेली गुलाबाची फुले ‘तुला हवा तोच आहे’ गंधातून चुगली लावून देतो. ती ओळखते आणि तो विस्मयीत होतो.

कसं ओळखलंस-कसं ओळखलंस सांग-सांग हैरान करु लागतो. ती फक्त हसते! त्याच्या हातातली फुले घेवून लाटांजवळ धावत जाते. तिच्या मागे तो पळतो आणि अस्ताला जाणारा सुर्य गुलाबी रंगाची बरसात करतो. लाटांशी खेळ करत, वाळूवर पाऊले रुतवत त्या दोघांची क्षितिजावर एक शत-पावली सुरु होते.

हातात हात गुंफले जातात. पावलांशी पाऊले मिळवले जातात. सहवास स्पर्शाचा अबोल एका क्षितिजाचा नजरेतून नजरेत संवाद पेरतो. उधळलेला प्रत्येक रंग त्यांच एकमेकांवरच प्रेम व्यक्त करतो. ते दोघं मात्र त्याच रंगांवर नजर खिळवून एकमेकांच्या शेजारी उभे असतात. नि:शब्द-स्तब्ध-हतबद्ध स्वत:च्या प्रेमाच्या उधळणीला दृष्ट लावत, हातांची गुंफण घट्ट करत अनवाणीच…रात्रीच गडद सावट उमटे पर्यंत..!

लेखक: पियुष खांडेकर

 

Marathi Kavita English Title: Marathi Kavita Sanj Kinara written by Piyush Khandekar.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित कथा

राहुन गेलेल्या बातम्या