Aadhaar Card Updates | आधारकार्डमध्ये बदल करताय, मग तो किती वेळा करता येऊ शकतो ते सुद्धा लक्षात ठेवा

Aadhaar Card Updates | तुम्ही भारताचे नागरिक आहात याची ओळख पटवून देण्यासाठी तुमच्याकडे आधारकार्ड असणे बंधनकारक झाले आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीकडे आज आधारकार्ड आहे. आधारकार्ड नसल्यास त्या व्यक्तीला अनेक कामांमध्ये अडचणी निर्माण होतात. आधारवर आपली संपूर्ण माहिती एका क्लिकमध्ये मिळते. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड दाखवणे अनिवार्य झाले आहे.
आधारकार्डवर आपली संपूर्ण माहिती असते. अगदी बॅंकेचे अकाउंट देखील आधारला लिंक केले जाते. मात्र यामध्ये चुकून काही माहिती चूकीची भरली गेल्यास ती दुरूस्त करणे देखील महत्वाचे आहे. चूकीची माहिती दुरूस्त करण्यात बराच वेळ वाया जातो. मात्र आता हे काम सहज सोपे झाले आहे. परंतू ही माहिती बदलण्याच्या देखील काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा नेमक्या कोणत्या हेच पुढे जाणून घेऊ.
प्रत्येक नागरिकाच्या नावाचे आधार कार्ड एकदाच बनवले जाते. यात काही बदल करणयात आले तरी ज्या क्रमांकावर आधार बनले आहे तो क्रमांक आहे तोच राहतो. तो बदलला जात नाही. तसेच अनेक व्यक्ती आपला फोटो वयानुसार बदलून घेत असतात. अनेकदा वेगळ्या ठिकाणी स्थाइक झाल्यास घराचा पत्ता देखील बदलावा लागतो. तसेच आधारला लिंक असलेला संपर्क क्रमांक बंद झाल्यास तो बदलून घेणे देखील गरजेचे असते. तर आता या सर्व गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी असलेल्या अटी पुढील प्रमाणे.
UIDAI ने दिलेल्या अटी
* आधारमध्ये फक्त २ वेळा नावात बदल करता येतो.
* तुमची जन्म तारीख फक्त एकदाच बदलली जाऊ शकते.
* संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच लिंग आणि अधिकची माहिती अपडेट करता येते.
* नाव, पत्ता आणि लिंग यात बदल करण्यासाठी नोंदनीकृत संपर्क क्रमांक जवळ असने आवश्यक आहे.
आधारमध्ये बदल करण्यासाठी नोंदणीकृत संपर्क क्रमांक बंधनकारक का?
जेव्हा आपल्याला आपल्या नाव, पत्ता, जन्मतारीख अशा गोष्टींमध्ये बदल करायचा असतो तेव्हा जवळ लिंक असलेला मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. कारण यावर तुम्हाला एक ओटीपी पाठवला जातो. हा ओटीपी स्क्रीनवर टाकल्यानंतरच तुमचा फॉर्म पुढे सरकतो. त्यामुळे नोंदनीकृत संपर्क क्रमांक बंधनकारक आहे.
माहिती बदल्यासाठी असा करा अर्ज
* सर्वप्रथम UIDAI वर लॉगीन करा.
* आधार क्रमांक आणि कॅप्चा निट भरा.
* संपर्क क्रमांक टाकून मिळालेला ओटीपी सदर फॉमवर समाविष्ट करा.
* पुढे होमपोजवर असलेल्या प्रोसीड टू अपडेट आधार या पर्यायावर क्लीक करा.
* त्यानंतर नाव, पत्ता, जन्मतारीख यापैकी ज्यात बदल करायचा असेल तो पर्याय निवडा.
* पुढे त्यासाठी लागणारे सर्व दस्ताएवज सबमीट करा.
* त्यानंतर पुन्हा एकदा संपर्क क्रमांक टाकून ओटीपी मिळवा.
* ओटीपी सदर फॉमवर समाविष्ट केल्यावर तुम्ही केलेले बदल समजतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Aadhaar Card Updates need to know check details 13 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL