7 May 2024 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

PM Swanidhi Yojana | पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्या आणि कोणत्याही हमी शिवाय मिळवा कर्ज, अधिक जाणून घ्या

PM Swanidhi Yojana

PM Swanidhi Yojana | कोरोना महामारीचा फटका नोकरदार वर्गापासून ते व्यवसाइकांपर्यंत सर्वांनाच बसला. या काळात लॉकडाऊन लागल्याने अनेक कंपन्यांचे नुकसाण झाले. त्यामुळे नोक-या गेल्या. तसेच बेरोजगारी वाढली. महामारीचा सर्वाधीक फटका हा फेरीवाले आणि लघू व्यवसायीकांना बसला. हातावरील पोट असल्याने यात अनेकांवर उपासमारीची देखील वेळ आली. यामुळे अनेकांना आपला जिव देखील गमवावा लागला. अशात या उपासमारीवर मात करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणा-या अनेक व्यवसायीकांसाठी केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजनेची सुरूवात केली.

या योजनेत कोणत्याही हमी शिवाय लघु व्यावसायिक विशेषत: फेरीवाल्यांना कर्ज देण्यात येते. फेरीवाल्या व्यवसाईकांना आपला व्यवसाय पुन्हा एकदा नव्याने सुरु करता यावा आणि असलेल्या परिस्थीतीवर मात करता यावी. तसेच बेरोजगारी दूर व्हावी हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. केंद्र शासनाने दिलेल्या माहिती नुसार आजवर १२ लाख व्यवसायीकांनी या योजनेचा लाभ घेउन कर्ज देखील फेडले आहे.

पंतप्रधान स्वनिधी योजना १ जून २०२० पासून सुरु करण्यात आली. ७ जुलै २०२२ रोजी जाहिर केलेल्या माहिती नुसार ५३.७ लाख पात्र अर्ज योजनेसाठी आले होते. त्यातील ३६.६ लाख कर्जाला मंजूरी मिळाली आणि ३३.२ लाख कर्जाचे वाटप झाले. या वर्षी जुलै महिन्यापर्यंत कर्जाचे वाटप करण्यात आले असून हा आकडा ३,५९२ कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे.

सबसिडी + कर्ज
पीएम स्वानिधी योजनेमध्ये रसत्यावर व्यवसाय करणा-या व्यवयीकाला सुरुवातीला १० हजार रुपयांचे रर्ज कोणत्याही हमी शिवाय दिले जाते. विशेष म्हणजे या कर्जावर सबसिडी देखील मिळते. व्यवसाय उत्तम सुरु झाल्यावर घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतर व्यवसायासाठी आणखीन दुप्पट रकमेचे कर्ज मिळवता येते. मिळणारे कर्ज हे तिन टप्प्यांत तुमच्या खात्यात जमा होते. या योजनेचा लाभ घेताना पहिल्यांदा १०,००० रुपयांचे कर्ज मिळते. त्याची परतफेड केल्यावर २०,००० रुपये कर्ज मिळवता येते. दुसरे कर्ज परत केल्यानंतर तिस-यांदा ५०,००० हजार रुपयांचे कर्ज मिळवता येते.

अर्ज कसा करावा
या योजनेत कोणत्याही बॅंकेत तुम्हाला तुमचे खाते सुरु करावे लागेल. त्यानंतर बॅंकेतून पीएम स्वानिधी योजनेचा फॉर्म दिला जाईल तो फॉर्म भरून त्याला आधारकार्डची एक झेरॉक्स कॉपी जोडावी आणि फॉर्म सबमिट करावा. तुम्ही या योजनेस पात्र असल्यास कर्ज तिन टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यात जमा होईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक
या योजनेत आधार कार्ड नसलेल्या व्यक्तींना पात्र समजले जात नाही. मिळालेले कर्ज फेडण्यास दरमहा ठराविक रकमेचा हप्ता भरून एक वर्षाचा कालावधी देण्यात येतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PM Swanidhi Yojana for loan facility check details 13 October 2022.

हॅशटॅग्स

#PM Swanidhi Yojana(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x