2 May 2025 10:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

तोंडाला मास्क नसल्याने पेट्रोल देण्यास नकार | पेट्रोल पंपाची केली तोडफोड

Goons attack, Petrol pump, Vasai, Marathi News ABP Maza

वसई, १९ सप्टेंबर : येथील माणिकपूर परिसातील पेट्रोलपंपवर तुफान राडा झाला. वसई पश्चिमेकडील या पेट्रोलपंपावर १० ते १२ जणांनी धिंगाणा करत पेट्रोलपंपची तोडफोड केली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मास्क नसल्यामुळे पेट्रोल देण्यास पेट्रोलपंपचालकांनी नकार दिला. हा राग मनात धरुन तरुणांनी पेट्रोलपंपवर येवून तोडफोड केली. दरम्यान याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

वसईच्या माणिकपूर येथील बेसीन पेट्रोल सप्लाय कंपनी या पेट्रोल पंपावर सायंकाळी पावणे 7 च्या सुमारास दोन जण बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले होते. मात्र, त्यांनी मास्क न घातल्याने पेट्रोल कर्मचाऱ्यांनी पेट्रोल बाईकमध्ये भरण्यास मनाई केली. त्यानंतर बाईकवाल्यांनी बाईक तेथेच ठेवून, पेट्रोल मालकाशीही हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यानंतर या दोघांनी जवळपास 20 ते 30 जणांचा जमाव घेवून आले (Guns Attack On Petrol Pump).

या जमावांने पोलिसांसमोर महिला, वृध्द पेट्रोल कर्मचारी, मालक यांना मारहाण केली. आग विझवण्याच्या बाटल्या, वीट फेकून मारहाण केली. कार्यालयाची, पेट्रोल पंपाचीही तोडफोड केली आणि हे सर्व नवघर माणिकपूर पोलिसांसमोरच झालं. त्यानंतर त्यांना अटक न करता पोलिसांनी हाकलून लावलं. सध्या नवघर माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

News English Summary: The storm hit the petrol pump in Manikpur area here. At this petrol pump in Vasai West, 10 to 12 people started vandalizing the petrol pump. The petrol pump driver refused to give petrol as there was no mask on Friday night. With this anger in mind, the youths came to the petrol pump and vandalized it. Meanwhile, a case has been registered with the police and the search for the accused is on.

News English Title: Goons attack on petrol pump at Vasai damage petrol pump Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#VasaiVirar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या