2 May 2025 4:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

३ वर्षांच्या मुलीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; मुलांची योग्य काळजी घ्या

News Latest Updates, Corona Virus Crisis

कल्याण: कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोना हे जागतिक संकट असून त्यावर आपण मात निश्चित करु. पण त्यासाठी आपल्याला राज्य सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच चिंतेत भर टाकणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. कल्याण शहरातील एका तीन वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. ही मुलगी राज्यातील सर्वात कमी वयाची कोरोना रुग्ण ठरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही मुलगी नुकतीच आपल्या आईवडिलांसह अमेरिकेहून परतली होती. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर या तिघांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलीच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान यापूर्वीच झाले होते. यानंतर आज मुलीचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.

 

News English Summery: Meanwhile, another alarming concern has emerged as coronary patients are steadily rising across the state. A three-year-old girl from Kalyan city has been infected with Corona. The girl became the youngest Corona patient in the state. According to preliminary information, the girl had just returned from the United States with her parents. The trio was taken to Kasturba Hospital when the symptoms of Corona started to appear. The girl’s father had already been diagnosed with coronary infection. After that, the girl’s Corona test was positive today.

 

News English Title: Story 3 year old girl in Kalyan got infected with Corona Virus News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Thane(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या