MLA Jitendra Awhad | चित्रपटगृहात जाऊन शो बंद केल्याच्या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड जामीनावर बाहेर आले. मात्र, त्यानंतर काही तासांतच त्यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला. जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याची तक्रार महिलेनं केलीये. यावरून वादविवाद सुरू झालेले असताना त्या घटनेचा व्हिडीओही समोर आलाय. कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं उद्धघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (13 नोव्हेबर) झालं. या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. याच कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय.

भाजपच्या महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा असलेल्या रिदा अजगर रशीद यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली. मिळालेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. यावरून ठाण्यातलं राजकारण तापलेलं असताना तो व्हिडीओ समोर आलाय.

ज्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप रिदा रशीद यांनी केलाय. त्या कार्यक्रमातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात आमदार जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन पुढे जाताना दिसत आहेत. त्याचवेळी समोरून रिदा रशीद येतात. रिदा रशीद यांना बाजूला करून जितेंद्र आव्हाड पुढे जाताना दिसत आहेत.

ऋता आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना
दरम्यान, ऋता आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना हा संतप्त सवाल केला आहे. गुन्हा दाखल करणारी महिला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आहेत का? त्या कधी भाजपच्या तर कधी राष्ट्रवादीच्या स्टेजवर असतात. छठपुजेच्यावेळी मुंब्र्यात टेन्शन होतं. या महिलेने त्यावेळी बाचाबाची केली होती. काही कारण नसताना बोंबाबोंब केली होती.

महिलेच्या विरोधात गुन्हे दाखल
कारण नसताना त्यावेळी तिने आव्हाडांवर अर्वाच्य भाषेत कमेंट केली होती. त्यामुळे या महिलेच्या विरोधात गुन्हे दाखल असून ती आणि तिची मुलगी जामिनावर आहे. ती केस अजूनही सुरू आहे. त्यामुळे आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा तिच्याकडे मोटीव्ह आहे, असं ऋता आव्हाड म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी होती. सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त होता. अशा ठिकाणी कुणी कुणाला बाजूला केलं तरी कुणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या महिलेलाही गर्दीमुळे खांद्याला धरून बाजूला केलं असेल. पण चार तासानंतर आपल्याला बाजूला केलं याची या महिलेला जाणीव कशी झाली? चार तासानंतर गुन्हा दाखल करण्याचं कारण काय? हा काय पोरकटपणा आहे, असा संताप ऋता आव्हाड यांनी व्यक्त केला.

आव्हाड हे निवडणुकीला उभे राहिले हा त्यांचा निर्णय होता. राजीनामा देणं हा निर्णय सुद्धा त्यांचाच असेल. मी त्यावर बोलणार नाही. पण त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंब्रा-कळव्यात प्रचंड अराजक निर्माण होईल. कोणी तरी रुपयावाला. एक रुपये चाळीस पैशावाला व्यक्ती एखाद्या माणसाला त्रास देत असेल आणि सरकार अशा लोकांना मदत करत असेल तर ते चुकीचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: FIR registered against NCP MLA Jitendra Awhad check details on 14 November 2022.

आव्हाडांवर गुन्हा दाखल करणारी भाजप महिला पदाधिकारी रिदा अजगर रशीद सुद्धा वादात, विरोधात गुन्हे दाखल, सध्या जामिनावर?