18 April 2024 2:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 बँकिंग शेअर्स तुम्हाला अल्पावधीत 38 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरने 3 वर्षात दिला 358% परतावा, आता सकारात्मक बातमी आली IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मालामाल होण्याची संधी, मजबूत फायदा होईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्स गुंतवणुकदारांना झटपट मालामाल करतोय, खरेदीला गर्दी Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांनी किती दिली टार्गेट प्राईस?
x

राणेंचा बारक्या! सुषमा अंधारेंनी कणकवलीत राणे पिता पुत्राचा 'सावरकर आणि गुजराती' विरोधी राजकारणाचा बुरखा फाडला

Sushma Andhare

Sushma Andhare | सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज नारायण राणे यांच्या मतदारसंघात म्हणजे सिंधुदुर्गात धडकली आहे. आमदार नितेश राणे यांचा मतदारसंघ असलेल्या कणकवलीत सुषमा अंधारे यांची सभा झाली. सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना सीआरपीसी कलम 149 अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस दिली होती. आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना ही नोटीस देण्यात आली होती. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी धडाकेबाज भाषण करताना राणे पिता पुत्राची पोलखोल तर केलीच पण इथल्या मतदारांना देखील वास्तवाची जाणीव करून दिल्याचं पाहायला मिळालं.

उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावाने ओळखला जाणारा हा जिल्हा आता दहशतवादी जिल्हा कसा झाला असा सवाल करत त्यांनी नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर निशाणा साधला. महाप्रबोधन यात्रेत बोलताना त्यांना नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्रांवरही जोरदार हल्लाबोल चढविला.

राणे पिता पुत्रांवर प्रहार :
नारायण राणे यांची बारकी लेकरे दहशतवाद माजवत गेली, श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे यांची हत्या कोणी केली? हे वेगळं सांगायची गरज नाही असा जोरदार टोलाही त्यांना सिंधुदुर्गात लगावला. राणे कुटुंबीयांवर टीका करताना त्यांना बाप वळण लावणारा असेल तर मुलांना वळण लागते अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर आज जोरदार हल्ला केला. त्यांच्याच बालेकिल्ल्यात येऊन त्यांनी राणे यांच्यावर हल्ला चढविल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण प्रचंड तापले होते. या महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांनी व्हिडीओ लावून पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना विधान परिषदेत कायदा सुव्यवस्थेवर भाषण करत होते. त्यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले त्याचे व्हिडीओ स्क्रीनवर दाखवून त्यांच्यावर टीका करण्यात आली.

नितेश राणे – ट्विट
चार वेळा ब्रिटिश सरकारची माफी मागणारे वीर सावरकर हे देशातील तरुणांसाठी आदर्श ठरू शकत नाहीत, असे ट्विट केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी २०१५ मध्ये केले होते. त्यावरूनही सुषमा अंधारेंनी हल्लाबोल केला.

MLA Nitesh Rane

भाजपवर हल्लाबोल :
पोलिसांनी नोटीसा देणं फार एक्स्पेक्टेड आहे. कारण ‘जिस्की लाठी, उसकी भैस होती है’, जर सत्ता त्यांच्या हातात असेल तर सत्तेचा गैरवापर किती अतिरेकी पातळीवर करायचा, हेसुद्धा त्यांच्याच हातात आहे. मला वाटतं भारतीय जनता पक्ष अत्यंत सूडबुद्धीनं वागत आहे आणि ती अतिरेकी पातळीनं करतं. वाईट याचं वाटतं या सगळ्यांमध्ये एकनाथ भाऊंच्या हातात काहीच नाही.”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena leader Shashma Andhare rally at Kankavali check details on 22 November 2022.

हॅशटॅग्स

#Sushma Andhare(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x