मोदींचे संकटमोचक, सिक्रेट '5M' मॉडेल फोडलं, 5M मधील 5वा विरोधकांसाठी भीषण, ब्राह्मण नेत्यांना कसं आणि का संपवतात? : खुलासा

Gujarat Jay Narayan Vyas | जय नारायण व्यास हे एक राजकारणी, विश्लेषक, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक, व्यवस्थापक आणि गुजरातमध्ये २००७ ते २०१२ या काळात भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.
उच्च शिक्षित आणि टेक्नॉलॉजी समजून घेण्यात तरबेज :
जय नारायण व्यास बडोदाच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवीधर आहेत आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे येथून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्यांच्याकडे मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पात्रता आणि कायद्याची पदवी देखील आहे. त्यामुळे ते मोदींना त्यांच्या पंतप्रधान पदाच्या प्रवासापूर्वी स्वतःच्या टीममध्ये हवे होते.
हुशार ब्युरोक्रॅट अधिकारी :
जय नारायण व्यास जलव्यवस्थापन तज्ज्ञ सुद्धा आहेत. अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी गुजरात सरदार सरोवर धरण प्रकल्पाचे नेतृत्व केले. हा भारतातील सर्वात मोठ्या बहुउद्देशीय जलव्यवस्थापन प्रकल्पांपैकी एक होता. सरदार सरोवर आणि मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांचे प्रभारी मंत्री या नात्याने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. पुनर्वसन, पर्यावरणीय नियोजन इत्यादी विविध अनुपालनांची खात्री करून देणारा हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात त्यांच्या योगदानामुळे त्यांची गुजरातमध्ये प्रशंसा करण्यात आली होती. ते मोदींची नजरेत होते आणि टीम मोदी मध्ये ते असावेत यासाठी स्वतः मोदी हालचाली करत होते. कारण गुजरात आणि देशाची सत्ता त्यांना स्वतःच्या मुठीक ठेवण्यासाठी हुशार ब्युरोक्रॅट अधिकाऱ्यांचे मेंदू स्वतःच्या राजकीय प्रवासात वापरायचे होते. गुजरातच्या उद्योग खात्यात नोकरशहा म्हणून त्यांचे दीर्घ आणि प्रभावी योगदान होते.
मोदींची त्यांच्यावर नजर होती :
त्याच्यासंबंधित १९९० मधील किस्सा असा होता की, गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना भाजपने स्वत:ला मजबूत करण्यासाठी सुशिक्षित लोकांना पक्षाशी जोडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. दिलीप पारीख आणि अनेक प्रमुख प्रबुद्ध लोकांसोबत जयनारायण व्यास यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशा लोकांना निवडणुकीत उतरवायचे, जेणेकरून काँग्रेसला तगडे आव्हान देता येईल, अशी मोदी गटाची तेव्हापासून रणनीती होती. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरात भाजपामध्ये संघटनमंत्री होते. व्यास एक दिवस व्याख्यान देणार होते, तेव्हा खानपूर भाजप कार्यालयातून त्यांना फोन आला. दुसऱ्या बाजूला खुद्द नरेंद्र मोदी होते. ‘तुम्हाला आगामी निवडणुकीत सिद्धपूरमधून निवडणूक लढवावी लागेल. तत्कालीन मुख्यमंत्री माधवसिंग सोळंकी आणि उद्योगमंत्र्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने व्यास तेथे गेले. “मला वेळ द्या, नाव जाहीर झालं तर सरकार निवृत्ती देणार नाही,” असं व्यास म्हणाले. त्यानंतर व्यास यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि नंतर निवडणूक लढवली. निवडणूक जिंकून ते आमदार झाले.
सध्याच्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी 32 वर्षे पक्षासोबत असलेले ज्येष्ठ नेते जय नारायण व्यास यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. गुजरातमध्ये ते वर्षानुवर्षे भाजप आणि मोदींचे संकटमोचक म्हणून ते सर्वांना परिचित होते. ब्राम्हण असलेले व्यास यांनी मोदींच्या पंतप्रधान पदापर्यंतच्या प्रवासात मोठी भूमिका बजावली होती. त्या प्रवासातील अनेक गुपित आणि मोदींचे सिक्रेट ‘5M’ त्यांना ठाऊक होते. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यावर त्यांनी आधीच सिक्रेट ‘5M’ वर काम करण्याची योजना आखली होती. त्यांनी पत्रकार दीपक शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ते सिक्रेट ‘5M’ अत्यंत धक्कादायक असून त्यातील ‘पाचवा M’ तर विरोधकांसाठी किती धोकादायक आहे याचा अंदाज ती मुलाखत पाहिल्यावर येऊ शकतो. तसेच मोदींच भाजपमधील ब्राह्मण नेत्यांना का आणि कसं राजकीय दृष्ट्या संपवतात याची देखील माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्र्र गडकरी आणि तर उपमुख्यमंत्री झालेले फडणवीस यांचा सुद्धा भविष्यात राजकीय खेला होणार नाही ना अशी शक्यता देखील बळावली आहे.
नेमकं काय विषय समोर आले या मुलाखतीत व्हिडिओ पहा :
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gujarat Jay Narayan Vyas disclosed Modi’s secret 5M with journalist Deepak Sharma during interview check details on 24 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON