22 September 2023 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? म्युच्युअल फंडस् एवढा पैसा का गुंतवत आहेत? शेअर सुपर मल्टिबॅगर? Reliance Share Price | हमखास फायद्याच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये मोठी घसरण, शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची योग्य संधी? Kajaria Ceramics Share Price | हा शेअर घेतला त्यांना कुबेर पावला, 3 रुपयाच्या शेअरने 40337% परतावा दिला, किती कोटी परतावा मिळाला?
x

Viral Video | चक्रीवादळात सुद्धा न्युज रिपोर्टर लाईव्ह रिपोर्टींग करत होता, वादळाच्या जोरात उडून जाता-जाता थोडक्यात वाचला, व्हिडीओ व्हायरल

Viral Video

Video Viral | सोशल मीडियावर अनेकदा आपण भयानक वादळाचे व्हिडीओ पाहिले आहेत. जेव्हा वादळ भुतासारखे सुटते तेव्हा त्याला कोणीही थांबवू शकत नाही. दरम्यान, अमेरिकेमधून एक व्हिडीओ समोर आला आहे तिथे ‘इयान’ चक्रीवादळाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. सर्व अमेरिका या वादळामुळे अस्वस्थ झाली आहे. तज्ञांकडून असेही सांगितले जात आहे की, हो वादळ अमेरिकेतील सर्व वादळांपैकी सर्वात धोकादायक वादळ आहे.

अमेरिकेला वादळाने झाडून काडले
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये धडकलेल्या ‘इयान’ चक्रीवादळा ने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. येथील 20 लाखांहून अधिक घरांमध्ये सध्या वीज नाहीये. तसेच गुरुवारी 29 सप्टेंबर रोजी सकाळी या वादळाचा वेग ताशी 241 किलोमीटर इतका होता, या वादळात एक बातमीदार अडकला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिपोर्टर मोठ्या कष्टाने आपला जीव वाचवताना दिसून येत आहे.

रिपोर्टने वाचवला आपला जिव
रिपोर्टर वादळाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या एका वाहिनीचे लाईव्ह रिपोर्टिंग करत होते आणि वादळाचा वेग इतका वाढला की रिपोर्टर हवेत उडत राहिला. रिपोर्टर मोठ्या कष्टाने जमिनीवर उभा राहिला, मग तो रस्त्याच्या कडेला धावू लागतो. पुढे सरकत सरकत तो खांबाला धरून उभा राहतो. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रिपोर्टर आपले रिपोर्टिंग चालू ठेवतो आणि स्टुडिओसोबत बोलत राहतो. वादळात अडकलेल्या या रिपोर्टरचे नाव जिम कॅंटर असून तो एका हवामान वाहिनीसाठी काम करतो.

धोकादायक वादळ ‘इयान’ :
अमेरिकेत आलेले हे धोकादायक वादळ आज 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता नेपल्सच्या दक्षिण-नैऋत्येस 105 किमी अंतरावर होते तसेच ते ताशी 17 किलोमीटर वेगाने पुढे जात होते, ज्याची माहिती देत ​​फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांनी बुधवारी 28 सप्टेंबर रोजी सांगितले की ‘हे एक मोठे वादळ आहे ज्यामुळे लोकांच्या जीवाला धोका आहे’. वाटेत येणाऱ्या सर्व शहरांतील लोकांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इयान चक्रीवादळाचा इशारा सुमारे 350 किमी क्षेत्रासाठी जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये टँपा आणि सेंट पीटर्सबर्गचाही समावेश आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: News reporter in Florida Hurricane Ian video trending on social media checks details 01 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x