15 December 2024 8:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ५ वेळा औरंगजेबला पत्र लिहिली होती, भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ताचा वृत्त वाहिनीवर संतापजनक दावा

Sudhanshu Trivedi

Veer Savarkar Letter to British | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद यांचं नातं जुनं आहे. आपल्या वक्तव्यांमुळे ते सतत वादात अडकतात. त्यानंतर त्यांना सारवासारव करावी लागते. आज पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटला असताना आता त्यापुढचा अंक भाजपने सुरु केला आहे का अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.

एकाबाजूला भाजप वीर सावरकरांच्या बचावासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले, तर दुसरीकडे याच मुद्यावरून टीव्ही वृत्तवाहिन्यांवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते त्या पत्रावरून वीर सावरकरांचा बचाव करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत तथ्यहीन दावे करून टीव्ही वृत्तवाहिन्यांवर खळबळ उडवून देत आहेत. असाच प्रकार भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी आज तक या वृत्त वाहिनीवरील केला आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी वीर सावरकरांच्या त्या पत्रासंबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, “त्यांनी (राहुल गांधी) जो सांगण्याचा प्रयत्न केला सावरकर यांनी माफी मागितली आहे, तर माफीनाम्याची जो गोष्ट आहे ती त्या काळात खूप जण तुरूंगातून बाहेर पडण्यासाठी एका फॉरमॅटमध्ये लेखी पत्र द्यायचे, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबला पत्र लिहिली होती, पण त्याचा अर्थ शपथ तर घेतली नव्हती ना”, अशी धक्कादायक आणि संतापजनक प्रतिक्रिया देत वीर सावरकरांचा त्या ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रावर बचाव सुरु केला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे भाजप यावर काय उत्तर देणार ते पाहावं लागणार आहे.

नेमकं काय म्हटलं भाजप प्रवक्त्यांनी :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sudhanshu Trivedi controversial statement against Chhatrapati Shivaji Maharaj to protect Veer Savarkar letter to British check details on 19 November 2022.

हॅशटॅग्स

#Veer Savarkar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x