मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट हौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांकडून मतदारांना चांदीची नाणी वाटप झाल्याचे आरोप केले जात आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनलचे उमेदवार चांदीची नाणी वाटतानाचे फोटो व्हायरल झाले आहे. त्यानंतर स्व. रघुवीर सामंत सहकार पॅनेलने घडला प्रकार स्थानिक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला त्यानंतर रात्री उशिरा शिवप्रेरणा उमेदवारांविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
बोरिवली येथे चांदीच्या नाण्यांसोबत शिवप्रेरणा उमेदवारांचे छायाचित्र असणारी कार्डे वाटल्याचे उघड झाले. व्हायरल झालेल्या या फोटोंसह सहकार पॅनेलचे उमेदवार अॅड विजय पवार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी, विभागीय सहनिबंधक, मुंबई जिल्हा उपनिबंधक, पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्याकडे रीतसर तक्रारी दाखल करण्यात झाल्या आहेत. शिवप्रेरणा पॅनलच्या उमेदवारांविरोधातील तक्रारींची योग्य ती तपासणी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्व. रघुवीर सामंत सहकार पॅनेलचे प्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांनी केली संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.
काय आहे तो नेमका चांदीच्या नाण्याचा फोटो?
