तनुश्री माध्यमांना चुकीची माहिती देत आहे: सहाय्यक दिग्दर्शक सत्यजित गझमेर
मुंबई : तनुश्री दत्ता पूर्णपणे चुकीची माहिती माध्यमांकडे पोहोचवत आहे आणि प्रसार माध्यमांनी सुद्धा तिच्या विधानांना प्रसिद्धी देताना विचार केला पाहिजे, असे ‘चॉकलेट’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक सत्यजित गझमेर यांनी म्हटले आहे. २०० लोक सेटवर असताना “चॉकलेट” चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तनुश्रीला कपडे काढायला लावले असा आरोप करून तनुश्री चुकीची माहिती माध्यमांना देत आहे, असं सेटवर उपस्थित असणारे सहाय्यक दिग्दर्शक सत्यजित गझमेर यांनी स्पष्ट करून तनुश्रीला फटकारलं आहे.
नाना पाटेकरांसोबतच तनुश्रीने चॉकलेट या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावरही गैरवर्तन केल्याचे गंभीर आरोप केले होते. २००५ साली ‘चॉकलेट : डिप डार्क सिक्रेट’ या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मला कपडे काढून नृत्य करायला सांगितले होते, असा गंभीर आरोप तिने केला होता. त्यावर या चित्रपटाचे सहायक्क दिग्दर्शक गझमेर यांनी फेसबुकवरील पोस्टद्वारे प्रतिक्रिया देऊन सत्य उघड केलं आहे.
‘चॉकलेट’ या सिनेमाबाबत माहिती देताना त्यांनी म्हटलं की, ‘चॉकलेट’ या चित्रपटात पहिल्यांदा बिपाशा बासूची निवड करण्यात आली होती. परंतु, तारखांच्या अडचणींमुळे बिपाशा ऐवजी तनुश्री दत्ताची या सिनेमासाठी निवड करण्यात आली. तसेच तनुश्रीची शिफारस मीच केली होती. तनुश्री चित्रपट सृष्टीत नवखी होती. पहिल्यांदा तिला सेटवर काहीच कळायचे नाही. अखेर आमच्या सिनेमाच्या टीमने सुरुवातीला तनुश्रीला नकार दिला. परंतु, मी तनुश्रीची निवड योग्य ठरेल, असे सांगितले होते. अखेर माझ्या शब्दाखातर विवेक अग्निहोत्री यांनी तनुश्री दत्ताची ऑडिशन घेतली आणि या सिनेमासाठी तिची निवड झाली. तनुश्रीला अभिनयात मदत मिळावी यासाठी विवेक अग्निहोत्री यांनी त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांना सेटवर पाचारण केले होते.
तनुश्रीला तांत्रिक बाबींचे तसेच अभिनयाचे प्रशिक्षण देण्याची जवाबदारी पल्लवी जोशींकडे होती. तनुश्रीचे मूड अनेकवेळा स्विंग होतात, याची मला पूर्ण कल्पना होती. मात्र शूटिंगदरम्यान ती बराचवेळ तिच्या कारमध्येच बसून राहायची, ती कधी कधी असं का वागायची आणि इतका वेळ ती कारमध्ये नक्की काय करायची ते तिलाच माहिती, असे गझमेर यांनी त्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा
- PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी